निरक्षर महिलांना नाटक शिकवणारी उत्कर्षा

लहानपणापासूनच ती गायन, नृत्य, एकपात्री प्रयोग करायची.
 उत्कर्षा च्यारी
उत्कर्षा च्यारी Dainik Gomantk
Published on
Updated on

उत्कर्षा जन्मली मुळातच घरचे सारे कलाकार (Artist) असलेल्या कुटुंबात. आई नृत्यांगना होती, कुटुंबातले इतर नाट्य कलाकार. घरात सर्वांनाच कलेची आवड. त्यामुळे उत्कर्षाला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन मिळत गेलं.

लहानपणापासूनच ती गायन, नृत्य, एकपात्री प्रयोग करायची. कुठलाही कार्यक्रम असो तिची आई तिला घेऊन जायची व कार्यक्रम संपल्यावर उत्कर्षा बक्षीस घेऊनच घरी यायची. तिचा आत्मविश्वास वाढत गेला. ती सांगते, एकदा व्यासपीठावर ती उभी राहिली की ती सर्वकाही विसरते. समोर प्रेक्षक आहेत व त्यांना आपली कला पहायची आहे एवढेच भान तिला असतं. तिचं शिक्षण मुष्टीफंड हायस्कूलमध्ये झालं. चांगले शिक्षक लाभले. शाळेत असताना अक्षर लेखन स्पर्धेत ती न चुकता भाग घ्यायची. तिची गायनाची आवड पाहून आईने तिला गायनाच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. त्याचबरोबर नृत्याचे शिक्षणही साधनाताई कुलकर्णी यांच्याकडे चालू होते. बालगंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा ती पास झाली. तिने बालभवनमध्ये सुरुवातीला नृत्य शिक्षिका म्हणून काम केलं. आता ती स्वतःच नृत्याचे वर्ग चालवते. तिला नृत्यशिक्षिका म्हणूनच लोक ओळखतात. नृत्यांच्या वर्गामुळे गाण्याला म्हणावा तसा वेळ ती देऊ शकली नाही त्यामुळे तिचं गाणं मागं पडलं. ती लोकनृत्यही शिकली. गोव्यात तसेच गोव्याबाहेर होणाऱ्या वेगवेगळ्या लोकनृत्यांच्या कार्यक्रमात ती सहभागी असते.

लग्नानंतर तिने स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. ग्रामीण महिलांना एकत्र करून तिने त्यांना नाटके शिकवली. त्यातल्या अनेक महिला कधी शाळेतच गेल्या नव्हत्या. अशा महिलांतदेखील तिने नाटकाची आवड निर्माण करून दिली. त्यांना शिकवायला तिला खूप मेहनत घ्यावी लागली परंतु ज्यावेळी या निरक्षर महिला आपलं भाषण न चुकता, चोखपणे आपली भूमिका सादर करतात त्यावेळी तिला आपण हौशी कलाकार तयार केल्याचे समाधान मिळते.

ती सांगते, माहेरी व सासरी कलेचे वातावरण. लग्न होऊन सासरी आल्यावर घरच्या सुनांनी घरातच रमायचे, चार भिंतीच्या आड आपली आवड लपवून ठेवायची, अशी प्रथा आजही सारीकडे पहावयास मिळते. मात्र उत्कर्षा याला अपवाद आहे. तिच्यात जिद्द होती, आहे व ती कायम राहणार. कला तिला स्वस्थ बसू देत नाही हे सत्य आहे.

 उत्कर्षा च्यारी
‘बूड’ न हालवता हजारो कोटी लुटण्याचे व्यसन

उत्कर्षाने धावशिरे, उसगाव येथे ‘ओम सत्यम सांस्कृतिक संस्था’ सुरू केली आहे. या संस्थेमार्फत तिने आतापर्यंत चार नाटकांची निर्मिती करून त्यांचे शेकडो प्रयोग वेगवेगळ्या गावात सादर केले आहेत. आतापर्यंत तिने शेकडो भूमिका केल्या. कलेची आवड असल्यामुळेच ती शून्यातून विश्व निर्माण करू शकली याचा तिला अभिमान आहे. अभिनय, लोककला, नृत्य, संगीत, एकपात्री याचबरोबर संस्कारात्मक भव्य रांगोळ्या रेखाटण्याची तिला आवड आहे. तिने ग्रामीण भागातल्या महिलांना संघठीत करून महिला कलाकार तयार केल्या. गावागावातून महिला नाट्यकलाकार निर्माण झाल्या तरच महिला अभिनेत्रींकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलेल असेच वाटते. ती म्हणते, नवोदित कलाकारानी वर्तमानपत्रे वाचावीत. त्यात एक कलाविषयक पान असतं निदान ते तरी वाचावं.

- भारती बांदोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com