गोवा संगीत महाविद्यालयचा 'सुगम संगीत’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम

 

Dainik Gomantak

ब्लॉग

गोवा संगीत महाविद्यालयचा 'सुगम संगीत’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

गोव्यात येत्या जानेवारीपासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा संगीत महाविद्यालय येत्या वर्षापासून‘सुगम संगीत’ ह्या प्रकाराअंतर्गत भावसंगीत आणि नाट्यसंगीत अशा दोन गीत प्रकारांमधे “अॅडॉन कोर्सेस” सुरू करीत आहे. असे अनेक लोक असतात की ज्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती; गाणे असो, तबला असो, हार्मोनियम असो ह्यापैकी आपली आवड जोपासण्यासाठी, आनंद घेण्यासाठी काही तरी शिकावं अस प्रत्येकाला वाटत असते, काही कारणास्तव, ही मनातली इच्छा अनेकळा राहून जाते. कलेचा (Art) केवळ आनंद घेता यावा, गाण्याच्या (Song) रूपाने व्यक्त होता यावं असं वाटत अशा लोकांसाठी (न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या “अॅडल्ट एज्युकेशन अंतर्गत) ‘संगीत महाविद्यालयातर्फे’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे, ज्याची साठ तासांमधे आखणी केली गेली आहे.

आठवड्याला तीन तास तीन (सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस) वर्ग घेतले जातील. अशा प्रकारे पाच महिन्यांच्या अवधीमधे हा अभ्यासक्रम पूर्ण होईल व सहाव्या महिन्यात परीक्षा घेऊन नंतर प्रमाणपत्र (Certificate) दिले जाईल. अर्थात, परीक्षा घेणं किंवा प्रमाणपत्र देणं हा केवळ ह्याचा प्रमुख उद्देश नसून त्यांना आनंद मिळणं, गाण्यातून चांगल्या प्रकारे व्यक्त होता येणं हा ह्यामागचा उद्देश आहे.

येत्या जानेवारीपासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. डिसेंबर एकोणतीस तारखेला इच्छुकांची प्रवेश चाचणी घेतली जाऊन साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा अभ्यासक्रम सुरू होईल. ह्याचं वेळापत्रक (Time Table) मुद्दामच दुपारी उशिरा ठेवण्यात आले आहे. नोकरवर्गाला सोयीस्कर व्हावं यासाठी अशी वेळ ठरवण्यात आली आहे.

‘सुगम संगीत’ गायनासाठी ज्या तांत्रिक गोष्टी आवश्यक असतात. त्या समजल्यावर गाण्याचा आनंद अधिकरित्या चांगल्याप्रकारे घेता येतो. ह्या गोष्टी या अभ्यासक्रमात शिकवल्या जातील, नाट्यगीत, भावगीत यांची पार्श्वभूमी, वेगवेगळ्या संगीतकरांच्या रचनांचा अभ्यास(Study) इत्यादी ह्या अभ्यासक्रमाचा भाग असेल. पण अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता अभ्यासक्रमाला धरून जे जे संस्कार करता येईल ते करण्याचे प्रयत्न केले जातील. गोव्यातील (Goa) प्रतिथयश कलाकार पं. चंद्रकांत वेर्णेकर (नाट्यसंगीत), वीणा मोपकर (भावसंगीत) हे या अभ्यासक्रमासाठी शिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT