Siya Shirvaikar, Anand Raikar, Srishti Prabhudesai Dainik Gomantak
ब्लॉग

Goan Food Blogger: लोकप्रिय गोमंतकीय फूड ब्लॉगर

फुड ब्लॉगर्सना एखाद्या स्टारचा दर्जा लाभत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goan Food Blogger अलीकडच्या काळात ‘सेलिब्रिटी स्टेटस’ मिळवणाऱ्या मंडळीत ‘ब्लॉगर्स’ या समुदायाचा देखील समावेश झाला आहे. त्यापैकी फुड ब्लॉगर्सना तर जणू एखाद्या स्टारचा दर्जा लाभत असतो.

ते कोणत्या रेस्टॉरंटसंबंधी, कोणत्या रेसिपीसंबंधी लिहितात याकडे त्यांच्या फॉलोअरचे बारीक लक्ष असते. गोव्यातील काही फूड ब्लॉगर्सनीही वाचकांमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

इंस्टाग्रामवर ‘दॅट चीजी गोवन’ ही फूड पेज बरीच लोकप्रिय आहे. इंजिनिअरिंगची पदवी मिळवणारी सिया शिरवईकर ही पेज चालवते. 2020 या वर्षी सुरुवात झालेली तिची ही ‘हौस’ आता तिच्या जीवनाची फार जवळचा भाग बनली आहे.

अस्सल गोमंतकीय जेवण देणारी रेस्टॉरंट्स, रिझॉर्ट या भोवती तिचे लिखाण मुख्यत्वेकरून फिरते. स्थानिकांना (गोमंतकीयांना) पाठबळ देण्याच्या तिच्या प्रयत्नामुळे तिला तिच्या फॉलोअर्सकडून प्रचंड प्रशंसा लाभत असते. 2020 मध्ये सीबा (SIBA) कडून तिला उत्कृष्ट ब्लॉगर (गोवा विभाग) म्हणून पुरस्कारही लाभला आहे.

आनंद रायकर हा देखील इंजिनियर आहे- मेकॅनिकल इंजिनियर! वेगवेगळ्या पाककृतींचा आस्वाद घ्यायला त्याला आवडते. पाककृतींचा त्याला मिळालेला अनुभव तो आपल्या ब्लॉगमधून शेअर करत असतो.

पाककृतींचे समीक्षण, रेस्टॉरंटची शिफारस आणि पाककृतीसंबंधात इतर कहाण्या हे त्याच्या ब्लॉगचे वैशिष्ट्य असते. आकर्षक फोटो आणि दर्जेदार लेखनातून तो आपल्या फॉलोअर्सना गुंतवून ठेवतो आणि त्यांच्याकडून प्रतिक्रियांची अपेक्षाही करतो.

कमी ज्ञात असलेल्या किंवा नवीन सुरू झालेल्या रेस्टॉरंटबद्दल आणि त्यांच्या शेफकडून मिळणाऱ्या खास सूचनांमुळे त्याचा ब्लॉग अनेकांकडून वाचला जातो.

सृष्टी प्रभुदेसाई व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. पण तिच्या उत्कट आवडीने तिला फूड ब्लॉगर बनवले. औषध असो वा पाककृती, ‘तुम्ही जे खाता, तसे तुम्ही बनता’ असा तिचा विश्वास आहे.

2019 च्या कोरोनाकाळात तिने इंस्टाग्रामवर आपले ब्लॉग लिहायला सुरुवात केली आणि अनेकांना साधे पण रुचकर घरगुती जेवण बनवण्यास प्रवृत्त केले.

स्थानिक खाद्यपदार्थांना चालना देणे, अस्सल गोमंतकीय पाककृतींना प्राधान्य देणे याचबरोबर गोमंतकीय पाककृतीचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे तिचे ध्येय आहे.

स्थानिक पाककृतींचा प्रसार केल्याबद्दल 2022 मध्ये ‘इंडिया फूड अँड बिवरेज असोसिएशन’कडून जिओ वर्ल्ड ड्रायव्हिंग, मुंबई येथे झालेल्या समारंभात तिला पुरस्कार लाभला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT