Goa Drugs Case: आलम भुरे शहाच्या ड्रग्स तपासणी अहवालात तफावत; सशर्त अटींनी जामीन मंजूर

चरसचा उल्लेख गांजा : संशयित आलमला जामीन; दोन वर्षे काढली तुरुंगात
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case ड्रग्‍सप्रकरणी दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असलेला आलम भुरे शहा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. पोलिसांनी त्याच्याजवळ चरस सापडल्याची नोंद केली असताना एफएसएलने दिलेल्या अहवालात गांजाचा उल्लेख केला आहे.

त्यामुळे या अहवालातच तफावत आढळून आली आहे. या खटल्यावरील सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात न्यायाधीश पद रिक्त आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्याला जामीन देण्यात येत असल्याचे निरीक्षण खंडपीठाने आदेशात केले आहे.

Goa Drugs Case
माऊलींचे नाव घेत 'ते' झाले वैकुंठात विलीन, देवकीकृष्ण वारकरी मंडळाच्या वारीत घडली घटना

संशयित आलम शहा याने एक लाखाची वैयक्तिक हमी तसेच एक किंवा दोन तत्सम रक्कमेचा हमीदार सादर करावा. खटल्यावरील सुनावणीला त्याने हजेरी लावावी तसेच प्रत्येक रविवारी अंमलीपदार्थविरोधी कक्षात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित राहावे.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये. साक्षीदारांना आमिष किंवा धमकावण्याचा प्रयत्न करू नये. पुन्हा तो ड्रग्ज व्यवसायात सापडल्यास त्याचा जामीन रद्द करण्यासाठी मुभा ठेवण्यात येत आहे असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

दरम्‍यान, अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी संशयित आलम भुरे शहा याला 1 किलो 100 ग्रॅम चरसप्रकरणी अटक केली होती.

Goa Drugs Case
Monsoon Update: पावसाच्‍या ट्रेलरनेच फोंडा जाम

जामीन देताना न्‍यायालयाने नोंदविले हे निरीक्षण

संशयित आलम शहा याच्‍याजवळ सापडलेला ड्रग्ज कमर्शियल साठ्यापेक्षा अधिक असल्याने कायद्यानुसार त्याला जामीन मिळू शकत नाही. त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीच नाही व त्याच्याविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा राज्यात नोंद नाही.

तो दोन वर्षांहून अधिक काळ न्यायालयात आहे. एफएसएलकडे जप्त करण्यात आलेल्या ड्रग्‍सचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्या अहवालात गांजा असल्याचे नमूद करण्यात आल्याने कायद्यातील कलम 37 त्याला लागू होत नाही.

तो गोमंतकीय असल्याने सशर्त अटी घालून जामीन देणे शक्य आहे. खटल्यावरील सुनावणीवेळी तो अनुपस्थित राहू शकतो याबाबत कोणताच मुद्दा समोर आलेला नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com