Open Music Group at Arambol Beach goa Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Music Group : ताल से ताल मिला...

रमल किनाऱ्यावर सुमारे २५-३० वर्षांपासून अनौपचारिकपणे ड्र्म सर्कल अस्तित्वात आहे.

दैनिक गोमन्तक

Arambol Beach: हरमल किनाऱ्यावर सुमारे २५-३० वर्षांपासून अनौपचारिकपणे ड्र्म सर्कल अस्तित्वात आहे. त्या काळी संध्याकाळ झाली की एखादा हिप्पी आपले वाद्य घेऊन किनाऱ्यावर यायचा आणि वाजवायला सुरू करायचा. हळूहळू त्याला इतर काहीजण येऊन मिळायचे आणि त्यांच्या वाद्यांच्या तालांचा एकत्रित आवाज वातावरणात एक जल्लोष निर्माण करायचा.

आजही हरमल, वागातोर, मांद्रे इथल्या किनाऱ्यावर तसेच तिथल्या काही कॅफेत मंडळी एकत्र येतात. बहुतेकांच्या हातात डिजेंबे हे वाद्य असते आणि मग त्यांच्या वादनातून निर्माण होणाऱ्या ताल-धुंदीत ते सारेच स्वतःला विसरून जातात. अशा प्रकारचे 'ड्रम सर्कल' उत्‍तर गोव्यातील किनारी पट्ट्यात सर्वसामान्य बनले आहे.

तालातून उच्च दर्जा आणि समन्वय निर्माण करणारी 'ड्रम सर्कल' ही प्रभावी उत्प्रेरक क्रिया आहे. ड्रम सर्कलमध्ये सहभागी होण्यासाठी तालांची माहिती किंवा सराव असणे आवश्‍यक नसते. तालाच्या साध्या वादनातून कोणीही सुरुवात करू शकतो.

लयीत आल्यानंतर त्यानंतर हळूहळू अनेक व्यामिश्र रचनांना प्रतिसाद द्यायला सुरुवात होते आणि मग त्यातून जादूई क्षण आकार घ्यायला लागतात.

सर्व वयोगटातील आणि विभिन्न क्षमता असणाऱ्या लोकांसाठी तत्काळ ताल-प्रचिती देणारा ड्रम सर्कल एक भन्नाट अनुभव असतो. एकदा सहभागी झालेल्याला ड्रम सर्कल मग कायमचे आपले बनवून टाकते.

लोकांना ड्रम सर्कल का आवडते? कारण त्यातून स्वतःला अभिव्यक्त करत असतानाच मनात समुदायाशी जुळल्याची भावनाही मूळ धरत असते. त्याचबरोबर हे वादन आपल्या शरीरातील तणाव संप्रेरकाची पातळी कमी करते.

अलीकडील संशोधन सांगते की ड्रम वाजवल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मनात एक प्रकारची निरोगीपणाची भावना तयार होते व मनावर घडलेल्या आघातांचे देखील विस्मरण होते. अशा प्रकारे ड्रम सर्कल शारीरीक स्वास्थ्य प्रदान करण्यात आपल्याला मदत करते.

कधीकाळी हरमलच्या किनाऱ्यावर सुरू झालेल्या ड्रम सर्कलचे वेड आज कळंगुटपर्यंत पोहोचले आहे. ‘ड्रम सर्कल’ अनौपचारिक असले तरी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात करणारी अनेक मंडळी आज गोव्यात आहेत. पर्यटकांबरोबर गोव्यातील अनेक स्थानिक मंडळीही ड्रम सर्कलमध्ये सहभागी होताना आज दिसतात.

मडगाव, पणजी इथली अनेक हौशी मंडळी आपल्या कुटुंबासमवेत ड्रम सर्कलमध्ये सहभागी होण्यासाठी खास हणजुणे किंवा हरमलला जातात.

हणजुणे येथे गरीमा तिवारी या आपले ड्रम सर्कल दर आठवड्याच्या रविवारी आयोजित करत असतात. शिस्तबद्‍धरित्या दर आठवड्याला आयोजित होत असलेले हे ड्रम सर्कल वगळल्यास गोव्यातील इतर ड्रम सर्कल अनौपचारिकपणे वेगवेगळ्या वेळी आयोजित होतच असतात.

हरमल येथील सुप्रसिद्ध ‘लव्ह टेंपल’’ मध्ये पर्यटन मोसमात, परदेशी पर्यटकांकडून दर दिवशी ड्रम सर्कल आयोजित होते. गोव्यात सध्या पावसाळी मोसम असल्यामुळे या दिवसात ‘ड्रम सर्कल’ सातत्याने आयोजित होत नाहीत. पण किनाऱ्यावरील एखाद्या जागी डोक्यावर एखादे छत पाहून कुणीतरी तिथे बसतो आणि आपले डिजेंबे वाजवायला सुरु करतो. त्याला येऊन मिळणारे अनेकजण असतात आणि मग लयबद्धपणे तिथे ताल प्रकटत राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT