गेल्‍या 5 वर्षांत विविध कार्यक्रमांवर सरकारकडून 500 कोटींचा चुराडा

पाच वर्षांत सरकारने कार्यक्रमांवर खर्च केलेला 500 कोटींचा मुद्दा तसेच थकबाकीवरून सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी केला.
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: वित्त विनियोग विधेयकप्रश्‍‍नी विरोधकांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. पाच वर्षांत सरकारने कार्यक्रमांवर खर्च केलेला 500 कोटींचा मुद्दा तसेच थकबाकीवरून सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी केला.

Goa Assembly Session
Sonsodo Garbage Issue: सोनसोडोतील कचऱ्यावर साळगावात करणार प्रक्रीया; बाबूश मोन्सेरात यांची माहिती, क्षमतेतही केली वाढ

आलेमाव म्हणाले, सरकारच्या सदोष धोरणांमुळे राज्याला दिवाळखोरीत ढकलले आहे. राज्याला अगोदरच आर्थिक चणचण भासत आहे.

जनतेला आशेचा किरण अजिबात दिसत नाही, कारण सरकार कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये उधळत आहे, असे आलेमाव म्‍हणाले.

Goa Assembly Session
Tigers in Goa Forests: गोव्‍याच्‍या जंगलांत वाघांचे अस्‍तित्‍व; विश्‍‍वजीत राणे

राज्याच्या डोक्यावर 28 हजार कोटींचे अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 1 लाख 90 हजारांचे कर्ज आहे.

असे असतानाही सरकारला आमदारांना अतिरिक्त भत्ते द्यायचे आहेत. लोककल्याण आणि विकासासाठी हा निधी वापरला पाहिजे.

- एल्‍टन डिकॉस्‍टा,केपेचे आमदार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com