Tigers in Goa Forests: गोव्‍याच्‍या जंगलांत वाघांचे अस्‍तित्‍व; विश्‍‍वजीत राणे

गोव्‍यातील जंगलांमध्‍ये वाघाचे अस्‍तित्‍व आहे. कॅमेऱ्यात कैद झालेली वाघाची छायाचित्रे वनविभागाकडे उपलब्ध आहेत
Tigers in Goa Forests
Tigers in Goa ForestsDainik Gomantak
Published on
Updated on

Tigers in Goa Forests: गोव्‍यातील जंगलांमध्‍ये वाघाचे अस्‍तित्‍व आहे. कॅमेऱ्यात कैद झालेली वाघाची छायाचित्रे वनविभागाकडे उपलब्ध आहेत, असे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आज गुरुवारी सभागृहात सांगितले. याबाबत बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी प्रश्‍‍न विचारला होता.

Tigers in Goa Forests
Goa Medical College: वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणविरोधी याचिकेवर आज खंडपीठाचा निर्णय

राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे कलम ३८ (व्ही) खाली राज्य सरकारच्‍या शिफारशीनुसार योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही व्‍याघ्रक्षेत्राची कार्यवाही होऊ शकते.

वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्‍प या दोन्हींसाठी वन्यजीव अभयारण्यात सार्वजनिक हितासाठी इतर उपक्रम राबविण्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून मंजुरी आवश्यक आहे, असे राणे म्‍हणाले.

Tigers in Goa Forests
Sonsodo Garbage Issue: सोनसोडोतील कचऱ्यावर साळगावात करणार प्रक्रीया; बाबूश मोन्सेरात यांची माहिती, क्षमतेतही केली वाढ

दरम्‍यान, वाघ आणि वन्यप्राण्यांच्या विनाश रोखणे तसेच त्‍यांचे संरक्षण करणे यासाठी गोव्यात व्याघ्र अभयारण्याची मागणी राज्‍यात जोर धरू लागली आहे.

म्हादई अभयारण्‍य क्षेत्र व्याघ्रप्रकल्प म्हणून आरक्षित करण्यासाठीचा लोक तसेच स्वयंसेवी संस्थांचा प्रस्ताव वनविभागाला प्राप्त झाला आहे. गोव्याच्या जंगलांमध्‍ये वाघ असल्‍याचे पुरावे मिळाले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२च्या कलम १८-२६ (अ) अंतर्गत एखादे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित केले जाऊ शकते.

- विश्‍‍वजीत राणे, वनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com