Mahashivratri Story in Marathi  Dainik Gomantak
ब्लॉग

Mahashivratri 2022: झाडानी गावात शिवशंभो महादेवांचे वास्तव्य..!

दैनिक गोमन्तक

- पद्माकर केळकर

नगरगाव-सत्तरी पंचायत क्षेत्रातील उस्ते गावापासून सुमारे पाच सहा किलोमीटर अंतरावर अगदी निर्मनुष्य असलेला ‘झाडानी’ गाव आजही शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या खुणा जपतो आहे. या झाडानी गावात सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी महामारी (प्लेग) रोग आला होता. त्यामुळे लोकांनी गावच सोडले पण गावातल्या देव-देवतांचे अस्तित्व मात्र तिथेच शाबूत राहिले. या देव-देवतांत देवाधीदेव महादेव यांचे स्थान अधिक ठळक आहे. साधारण वीस वर्षांपूर्वी परिसरातील गावातील नागरिक या निर्मनुष्य गावात भटकंतीच्या निमित्ताने आले असता, तिथे शिवलिंग व अन्य देवतांच्या पाषाणमूर्ती नजरेस पडल्या. (Mahashivratri Story)

ही खबर सर्वत्र पसरली व त्यानंतर त्या ‘झाडानी’ गावात दरवर्षी महाशिवरात्र (Mahashivratri) मोठ्या उत्साहात साजरी केली जाऊ लागली. गेला बराच काळ हे शिवलिंग उघड्या आकाशाखाली होते. दरवर्षी सत्तरीतील भाविकमंडळी एकत्र येऊन या परिसराची साफसफाई करून उत्सव साजरा करीत होते. पण गतवर्षी लोकांनी त्या जागी मंदिर उभारले आहे त्यामुळे गेल्या शेकडो वर्षापासून उध्दाराच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसराला गतवैभव प्राप्त झाले आहे. मंदिराला पत्र्यांचा वापर करून आकर्षक आकार देण्यात आला आहे. जमिनीवर फरशा घालण्यात आलेल्या आहेत. उत्सवाच्या निमित्ताने गेली आठ वर्षे तिथे दशावतारी नाटकही सादर केले जाते.

उस्ते गावातुन चालत भक्त मंडळी या उत्सवासाठी जातात. साधारण तास-सव्वा तासांचा प्रवास असतो. काल सोमवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळपासून या स्थानावर धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. रात्रौ दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोगही पार पडला. आज, मंगळवारी पहाटे शिवलिंगाची विधिवत पूजा होईल.

या जागी शिवलिंग, बसवेश्वर नंदी, सातेरी देवी, ब्राम्हणी माया, केळबाय अशा देवदेवतांच्या मुर्त्या आहेत. महाशिवरात्र साजरी करण्यासाठी झाडानी गावात पोहचण्यासाठी उस्तेतून वाहन जाण्याची सोय नाही. हजारो संख्येने लोक भक्तीभावनेने पायी चालत तिथे जातात. कच्चा रस्त्याने कुमठळ गावामार्गे वाहन जाऊ शकते. त्या मार्गाचा वापर केला जात असला तरी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बहुतेकजण उस्ते गावातून पायी जातात. वाटेत दोन तीन ठिकाणी म्हादई नदीही ओलांडावी लागते. झाडानी गावात वीज नाही. जनरेटरचा वापर करुन हा गाव प्रकाशमय केला जातो.

या मंदिराच्या (Temple) अगदी लगतच म्हादई नदी वाहते. त्यामुळे अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहून भक्तगण महाशिवरात्र उत्सवाच्या आनंदमयी वातावरणात सहभागी होतात. एरव्ही एखाद्या गावात काला, दशावतारी नाटक असले तरी ती पाहण्यासाठी अलिकडच्या वर्षात लोकांची गर्दी होत नसते. कारण ही नाटके रात्री दोन वाजता सुरु होतात पण या उत्सवाच्या निमित्ताने झाडानी गावात होणार्या नाट्यप्रयोगाला मात्र उसळती गर्दी असते. उत्सवात सामील झालेल्या व्यक्तीला रात्रीचे घरी परतता येत नाही. सर्वांना सुर्योदयाची वाट पाहत थांबावे लागते. त्यामुळे दशावतारी कलाकारांचा नाटक सादर करताना उत्साह वाढतो व नाटकही तेवढेच दमदारपणे केले जाते.

सत्तरी (satari) तालुक्याला फार मोठा आकर्षक इतिहास लाभलेला आहे. इतिहासातील आठवणीच्या पाऊलखुणा जपत सत्तरीच्या अशा निसर्गरम्य जंगलात असे उत्सव साजरे करणे हा आनंद-अनुभवच असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT