भव्य कल्पकतेचा आविष्कार सत्यात उतरवणारा 'सिद्धेश'

पणजीतील विनायक डेकोरेटरच्या प्रोफायटर सिद्धेशचा हा पिढीजात व्यवसाय वडील विनायक देसाई यांच्याकडून मिळाला आहे.
Siddhesh Desai
Siddhesh DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भव्य कल्पकता सत्यात उतरवणारे पडद्यामागील कलावंत नेहमी उपेक्षित असतात . बऱ्याच वेळा त्याची वाच्छताही होत नसतेच. अनंत अडचणीना तोंड देऊन तो आविष्कार साकारलेला असतो याची पुसटशी कल्पना आपल्या नसते. मात्र ते लोक अत्यंत नेटाने आपल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र झटत असतात यातीलच एक नाव म्हणजे सिद्धेश देसाई. सजावटीच्या भव्य कलाकृती साकारण्यात सिद्धेश देशपातळीवर प्रसिद्ध आहे.

Floats
FloatsDainik Gomantak

पणजीतील विनायक डेकोरेटरच्या प्रोफायटर सिद्धेशचा हा पिढीजात व्यवसाय वडील विनायक देसाई यांच्याकडून मिळाला. सिद्धेशने 2008 साली तो आपल्या वडिलांकडून आपल्या ताब्यात घेतला आणि या व्यवसायाला नव तंत्रज्ञान आणि कल्पकतेची जोड देत नवी उभारी दिली. या जोरावर सिद्धेश देशातला सर्वात लहान प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ साकारणारा गोमंतकीय ठरला आहे. याशिवाय सलग गेली चार वर्ष तो कार्निवलच्या किंग मोमोचा चित्ररथ साकारत आहे. याशिवाय गोवा पोलीस दलाचे चित्ररथ सिद्धेशने साकारले आहेत.

त्यामुळे सद्या तो गोवाभर चर्चेत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मुख्य सजावटीचे सर्व काम अतिशय देखण्या पद्धतीने त्याने आविष्कृत केले आहे. अनेक महोत्सवात त्याने साकारलेल्या चित्ररथाना अनेक पारितोषिक तर मिळालेच आहेत मात्र ते चित्ररथ आजही वर्षानुवर्षं लोकांच्या स्मरणात आहेत. याशिवाय महत्त्वाच्या उत्सव महोत्सवाचे, चित्रपटांचे सेट उभारण्यात सिद्धेश अजोड आहे.

Goa Floats
Goa Floats Dainik Gomantak

खा, प्या ,मजा करा हा संदेश देणाऱ्या किंग मोमोची सध्या राज्यात राजवट सुरू आहे. या किंग मोमोच्या मुख्य चित्ररथाचे काम सलग चार वर्ष सिद्धेश साकारत आहे. याशिवाय गोवा पोलीस दलाच्या चित्ररथासह अनेक चित्ररथ सिद्धेश अविष्कृत करत आहे. चित्रपट महोत्सवाची मुख्य सजावट

King Momo
King MomoDainik Gomantak

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात स्थिरावल्यानंतर या महोत्सवाच्या सजावटीचे काम आत्तापर्यंत गोव्याबाहेरील व्यक्तींना मिळत होते मात्र आता हे काम सिद्धेशने साकारून आपल्या राज्याला जगभरातल्या सिने रसिकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडले आहे. 2021 मध्ये दोन्हीवेळा झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मुख्य सजावटीचे (मेन डेकॉर) करून हा महोत्सव अनेकांच्या स्मरणात ठेवला आहे.

शिगमोत्सवाचे चित्ररथ

शिगमोत्सव हा गोमंतकीयांचा पारंपारिक उत्सव. गेल्या चाळीस वर्षांपासून विनायक डेकोरेटर उत्सवातील अनेक चित्ररथ साकारताहेत. अत्यंत देखण्या कलाकृती साकरण्यात विनायक डेकोरेटरची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या अनेक चित्ररथाना शिगमोत्सवाची पारितोषिके मिळाली आहेत.

Goa
GoaDainik Gomantak

प्रजासत्ताक दिन परेड चित्ररथ

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील परेडवेळी अनेक राज्ये आपल्या राज्याची कला-संस्कृती आणि वेगळेपण राजधानीत मांडतात. 2017 आणि 2020 या दोन वेळा सिद्धेशने गोव्याच्या चित्ररथाचे प्रतिनिधित्व करून सर्वात लहान वयात अशा प्रकारचा चित्ररथ साकारण्याचा बहुमान त्याने गोव्याला मिळवून दिला आहे.

IFFI
IFFIDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com