Lata Mangeshkar  Dainik Gomantak
ब्लॉग

मंगेशीत जुने घर : ‘मागे उभा मंगेश...’ गीत अजरामर

स्थानिकांनी जागविल्या आठवणी

दैनिक गोमन्तक

मंगेशी: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांच्या मंगेशी (ता. फोंडा) या गावी आज शोकाकुल वातावरण होते. मंगेशकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत लतादीदींना आदरांजली अर्पण केली. (Lata Mangeshkar)

लतादीदींचे (Lata Mangeshkar) वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म मंगेशी येथे झाला होता. आजही त्यांचे जुने घर येथे आहे. पणजीपासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगेशी येथे आज प्रस्तुत प्रतिनिधीने भेट देऊन तेथील लोकांच्या भावना जाणून घेतल्या.

मंगेशकर कुटुंबाच्या गावाच्या नात्याविषयी माहिती देताना येथील प्रसिद्ध मंगेश मंदिराचे पुजारी शैलेश अभिषेकी म्हणाले, मंगेशाच्या मंदिरावरूनच गावाला मंगेशी नाव पडले. या देवाचे काही सेवेकरी मंडळी आहेत. लतादीदींचे वडील दीनानाथ यांचे आधीचे आडनाव वेगळे होते. मंदिराचे ते देखील सेवेकरी असल्याने येथून जाताना त्यांनी मंगेशकर हे आडनाव लावले.

लतादीदी येथे 12 वर्षांपूर्वी शिवरात्रीला मंदिरात (Temple) दर्शनासाठी आल्या होत्या. ही त्यांची अखेरची भेट. त्यांच्या भगिनी आशाताई, बंधू हृदयनाथ दर्शनास येथे नेहमी येतात. मंगेशकर कुटुंबाच्या गावाचा फारसा नाही; पण मंदिराशी कायम ऋणानुबंध राहिला. मंगेशावर त्यांनी गायलेले ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गीतही अजरामर आहे. लतादीदींमुळे गावाचे नाव साऱ्या देशभर पोहोचले याचा आम्हाला अभिमानच वाटतो.

संगीताचा रियाज

दोनशे घरांच्या मंगेशी (Mangeshi) गावामध्ये सध्या मंगेशकर नावाची साधारण चार घरे आहेत. लतादीदींच्या शेजारी राहणारे अरविंद मंगेशकर म्हणाले, लतादीदींच्या वडिलांचा जन्मच आमच्या घरात झाला होता. येथेच ते अभिषेकी कुटुंबीयांसमवेत रियाज करीत. त्यांचे येथे नेहमी येणे-जाणे होते.

- धनंजय बिजले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: संसद की कुस्तीचा आखाडा? लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महिला खासदारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींचे केस ओढले अन् थप्पडही लगावले

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

SCROLL FOR NEXT