नथूरामने गोळ्या झाडण्यापूर्वी गांधीजींवर झाले होते 5 हल्ले

25 जून 1934 रोजी गांधीजी पुण्यात भाषण देण्यासाठी आले होते, तेव्हा कटकर्त्यांनी बापूंना मारण्यासाठी कारमध्ये बॉम्बस्फोट केला होता.
Mahatma Gandhi Death Anniversary
Mahatma Gandhi Death AnniversaryDainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य नायक मोहनदास करमचंद गांधी (#MahatmaGandhi) यांचे 30 जानेवारी 1948 रोजी निधन झाले. देश यावर्षी गांधीजींची 74वी पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary) साजरी करत आहे. यावेळी पंतप्रधानांपासून ते देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी राज घाटावर त्यांना श्रद्धांजली वाहली. महात्मा गांधींनी देशासाठी जे केले ते देश शतकानुशतके लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्यांचे आदर्श, अहिंसेची प्रेरणा, सत्याची शक्ती त्यांच्या या तत्वांनी इंग्रजांनाही नतमस्तक होण्यास भाग पाडले. या योगदानामुळे गांधीजींना आज महात्मा गांधी म्हणून संपुर्ण जगभर ओळखले जाते. (Mahatma Gandhiji was attacked five times before Nathuram fired)

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या करण्यात आली

30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिर्ला भवन येथे महात्मा गांधींची नथुराम गोडसेनी हत्या केली. अहिंसेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा अंत झाल्यानंतर देशवासीयांनी गांधीजींना राष्ट्रपिता मानले. पण या हल्ल्या आधीही त्यांच्यावर अनेक हल्ले झाले होते.

25 जून 1934

25 जून 1934 रोजी गांधीजी पुण्यात भाषण देण्यासाठी आले होते, तेव्हा कटकर्त्यांनी बापूंना मारण्यासाठी कारमध्ये बॉम्बस्फोट केला होता.

जुलै 1944

विसाव्यासाठी पाचगणी येथे गांधींच्या जाण्याचे नियोजन ठरले होते आणि येथेच आंदोलकांच्या एका गटाने गांधीविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी नथुराम यांना देखील चर्चेसाठी आमंत्रित केले होते मात्र नंतर त्यांना निमंत्रण नाकारण्यात आले. या प्रसंगानंतर प्रार्थना सभेच्या वेळी गोडसे गांधीजींकडे खंजीर घेऊन धावताना दिसले, पण सुदैवाने त्यांना मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याचे भिलारे गुरुजी सामोरे गेले.

सप्टेंबर 1944

महात्मा गांधींनी सेवाग्राम ते बॉम्बे असा प्रवास केला, जिथे मुहम्मद अली जिना यांच्याशी ते चर्चा करणार होते. तेव्हा नथुराम गोडसेंनी त्यांच्या टोळीसह गांधींजींना अडवले होते. मुंबई सोडू नये म्हणून आश्रमात गर्दी जमवली होती. त्यानंतरच्या तपासादरम्यान डॉ. सुशीला नायर यांनी उघड केले की आश्रमातील लोकांनी नथुराम गोडसेला गांधींपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.

जून 1946

गांधी स्पेशल ट्रेनने पुण्याला जात असताना गांधींना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला होता. रुळांवर ठेवलेल्या दगडांमुळे ट्रेन रूळावरून घसरली मात्र चालकाने आपल्या कौशल्याने जीव वाचवला. तरीही नेरुळ आणि कर्जत स्थानकादरम्यान या ट्रेनला मोठा अपघात झाला ज्यामध्ये गांधीजी सुदैवाने बचावले.

Mahatma Gandhi Death Anniversary
Goa Election 2022: राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर

20 जानेवारी 1948

बिर्ला भवन येथे झालेल्या सभेदरम्यान बापूंवर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. मदनलाल पाहवा, नथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, दिगंबर बैज, गोपाळ गोडसे आणि शंकर किस्तैय्या यांनी गांधीजींना बैठकीला उपस्थित राहण्याची योजना आखली होती. त्यांना व्यासपीठावर बोलवायचे आणि बॉम्ब फेकायचा आणि नंतर गोळी मारायची असा कट त्यावेळी रचण्यात आला होता. पण सुदैवाने, सुलोचना देवींनी वेळेत हा डाव ओळखल्यामुळे मदनलाल पकडला गेला आणि गांधीजींना मारण्याची योजना फसली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com