Fashion e-calendar Dainik Gomantak
ब्लॉग

Fashion E-Calendar : आयकॉनिक 11 : फॅशन ई-कॅलेंडर

आम्ही कामाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यावर विश्वास ठेवतो

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसाद पानकर

Fashion E-Calendar कॅलेंडरची पाच पाने उलटली होती आणि सहाव्या महिन्याच्या पानासाठी आम्हाला काहीतरी वेगळे शूट करायचे होते. यावेळी एखाद्या यॉटवर शूट करण्याचे आम्ही मग ठरवले. मी लगेच माझी मैत्रीण सुचेता पोतनिस हिला फोन लावला, जिच्या यॉटवर मी 2004 या वर्षी शूट केले होते.

सुचेताकडून मला कळले की तिने तिची यॉट विकली होती पण तिने स्वतःहून सावियो मथाईस यांना फोन लावला, जे आता त्या यॉटचे सर्वेसर्वा होते. माझा पुढचा फोन सावियो यांना गेला, ज्याची ते वाटच पाहत होते. त्यांनी लगेच मला हिरवा सिग्नल दिला. मुख्य अडथळा दूर झाला होता.

पुढचे पाऊल मॉडेल निवडणे हे होते. लागलीच माझ्या डोळ्यांसमोर अ‍ॅबिगेल डिसोजा हे नाव आले. अ‍ॅबिगेल उंच असल्याने त्याला शोभण्यासारखी मॉडेल होती अदनान शेख. ही जोडी नक्कीच ग्लॅमरस होती.

यावेळी आम्ही यॉटवर शूट करत असल्यामुळे मॉडेलसाठी नॉटिकल फॅशन योग्य ठरेल असे आमची फॅशन स्टायलिस्ट कँडीस ग्रे हिला वाटत होते. आम्ही लागलीच आमचे फॅशन पार्टनर, कवळेकर न्यू कलेक्शन यांच्याकडे मॉडेल सोबत पोहोचलो आणि तिथे आमचे स्वागत नेहमीप्रमाणेच हसतमुख झाले.

कॅन्डीसला यावेळी फार शोधत बसावे लागले नाही. अ‍ॅबिगेलसाठी पांढरा आणि निळा नॉटिकल टॉप आणि त्याच्याबरोबर जाणारी छानशी निळी विजार आणि अदनानसाठी निळा पेस्ली शर्ट आणि हलक्या राखाडी-निळ्या रंगाची लिनन विजार!

इथपर्यंत छान चालले असल्यामुळे मला वाटले होते की यावेळी आम्हाला फारशा अडचणी येणार नाहीत. पण कसचं काय? आमची मेकअप आर्टिस्ट डेसिमा कॉस्टा यावेळी उपलब्ध नव्हती.

अशावेळी माझी मुलगी तनुष्का हीच माझ्या मदतीला आली. ती लहान वयातच एक उत्तम मेकअप कलाकार बनली आहे. केशरचना आणि मेकअप हा तिचा छंद आहे आणि त्यात ती उत्तम कामगिरी करते आहे.

शुटच्या दिवशी पहाटे 5 वाजता विशाल आणि निखिल घरी येऊन पोहोचले आणि कामाला सुरुवात झाली. अ‍ॅबिगेलदेखील आपल्या आईबरोबर येऊन पोहोचला होता. कॅन्डीसने तनुष्काला तिच्या अपेक्षा सांगितल्या आणि अनुष्काने आपली मेकअपची जादू अ‍ॅबिगेलवर आजमावायला सुरुवात केली.

मेकअप आटोपल्यानंतर म्हापसा टॅक्सी स्टँडवर जाऊन आम्ही प्रथम चहा घेतला. चहाशिवाय काम करणे अशक्यच असते.

आमची दुसरी मॉडेल अदनान हिला तसेच मॉरिसन आणि नेव्हील यांना आम्ही वाटेत गाडीत घेतले आणि सरळ बिठ्ठोण येथील जेटीवर जाऊन सॉलिटा यॉटवर पाय ठेवले. कॅप्टन विवेक आपल्या माणसांबरोबर आमची वाटच पाहत होते.

यॉटवर पोहोचतात वातावरण एखाद्या सहलीसारखे वाटू लागले. यॉट सुरू झाली. मला रायबंदर येथील ‘सोलर डोस कुलासोस मेंशन’ हे सुंदर निवासस्थान छायाचित्रात पार्श्वभूमी म्हणून हवे होते. या प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंददायी होता.

विशाल या महिन्याच्या छायाचित्राचा फोटोग्राफर होता. यॉट, ग्लॅमरस मॉडेल, स्टाइलिश पोशाख आणि पार्श्वभूमीवर असलेला भव्य इंडो-पोर्तुगीज निवास यापेक्षा आम्ही अधिक काही मागितलेच नसते. छायाचित्राने विषयाला उत्तम न्याय दिला होता.

परतीच्या प्रवासात प्रत्येक जण मॉडेल होता आणि मोबाईलवर एकमेकांचे फोटो घेताना आम्ही सारेच उत्तेजित होतो. यॉटवरचे क्रू सदस्यही मैत्रीपूर्ण वागत होते.

बिठ्ठोण जेटीवर पोहोचताच भुकेची जाणीव झाली आणि आमच्या गाड्या पर्वरीच्या कॅफे भोसलेच्या दिशेने वळल्या. आम्ही कामाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यावर विश्वास ठेवतो आणि यावेळी तर तो परमोच्च लाभला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT