Querim News: वीजखांब मोडले, बाकडे गायब, शोभेच्या वस्तूंची नासधूस; केरीमधील 'या' गार्डनमध्ये नक्की चाल्लय काय?

साधन-सुविधा गायब : योग्यप्रकारे निगा न राखल्यामुळे गार्डनची दुरावस्था
Querim News
Querim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Querim Beach सुरूच्या बनामुळे केरी किनाऱ्याला वेगळ पर्यटन स्थान मिळाले आहे. सुरूच्या बनांना संरक्षण देण्याच्या नजरेतून जलसिंचन खात्यांतर्गत केंद्र सरकारच्या निधीतून संरक्षक भिंत बांधत असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सूचनेनुसार जलसिंचन विभागांतर्गत पर्यटन क्षेत्राला वाव मिळावा, स्थानिक नागरिक, पर्यटक यांना आराम मिळावा यासाठी आजोबा गार्डनची निर्मिती केली. पण आता निगा न राखल्यामुळे या गार्डनची स्थिती भयानक झाली आहे.

Querim News
आम्हालाही मोफत बससेवा द्या!

पार्सेकर मुख्यमंत्री असताना या गार्डनचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी या गार्डनची निगा राखली जायची. परंतु त्यानंतर मात्र सुरुवातीच्या काळात जे विजेचे बल्ब खांबावर लावले होते. ते फोडण्याचा प्रकार काहीजणांनी केला.

त्यानंतर गंजून हे वीजखांब मोडले. गार्डनमध्ये बसवण्यात आलेले बाकडेही गायब झाले. आता हे गार्डन आहे की आणखी काय? असा प्रश्न पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना पडतो.

हे गार्डन सध्या एक शोभेची वास्तू नव्हे तर स्क्रॅपसारखी निराधार जागा असल्याचे दिसत आहे. या गार्डनच्या देखभालीसाठी सरकारने कसल्याच प्रकारच्या उपाययोजना न केल्यामुळे या गार्डनची दुरवस्था झालेली आहे.

या गार्डनवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि हा सर्व पैसा करदात्यांच्या करातून सरकारी तिजोरीत आलेला आहे. तो पैसा वाया गेल्याचे गार्डनची स्थिती पाहून दिसून येते.

Querim News
Margao News : दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित दोड्डामणीला जामीन

मांद्रेत एकूण तीन गार्डन

मांद्रे मतदारसंघात एकूण तीन गार्डन आहेत. त्यामध्ये सर्वात आकर्षक असलेले गार्डन मोरजी खिंड परिसर तर दुसऱ्या क्रमांकावर जुनसवाडा फॉरेस्ट पार्क आणि तिसरे केरी आजोबा गार्डन. ही तिन्ही गार्डन तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री आणि आमदार असतानाच बनली आहेत.

सरकारने पुढाकार घ्यावा

या तिन्ही गार्डनची सरकारने व्यवस्थित निगा राखावी. यावर जो जनतेच्या करातील पैसा खर्च करण्यात आलेला आहे त्याचा चांगल्या कामासाठी वापर व्हावा या नजरेतून सरकार आणि स्थानिक पंचायत मंडळांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता पुढे येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com