Siya Sarode Dainik Gomantak
ब्लॉग

देशाला चार पदके मिळवून देणाऱ्या सियाचा दैदीप्यमान आलेख

गोमन्तक डिजिटल टीम

मंगेश बोरकर

केवळ तिचा जबरदस्त आत्मविश्र्वास, जिद्द व कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याच्या तिच्या तयारीमुळे ती ही अफलातून कामगिरी करू शकली. सियाने पॉवरलिफ्टिंगमधील डेडलिफ्ट व स्कॅटमध्ये सुवर्णपदके तर कम्बाईन रौप्य बेंच प्रेसमध्ये कांस्यपदक जिंकले. सियाला सुरवातीला बर्लिनला जायला व्हिसा मंजूर झाला नव्हता. शेवटच्या क्षणाला व्हिसा मंजूर झाल्यानंतर ती बर्लिनला गेली व कसलेही दडपण न घेता तिने चमकदार खेळ केला.

सियाचे संपूर्ण आयुष्य हा एक खडतर प्रवास आहे. सिया अगदी लहान असताना वडील घर सोडून गेले ते परत आलेच नाहीत. त्यानंतर ती नऊ वर्षांची असताना तिच्या आईला देवाज्ञा झाली. त्यामुळे तिला तिच्या पाच मामांनी मिळून वाढविले. ती भाटी येथील नाईक कुटुंबात राहते. तिला तिच्या कुटुंबीयांकडून प्रोत्साहन व आशीर्वाद मिळाले म्हणूनच ती यशाचे शिखर गाठू शकली.

आम्ही तिला आमचीच मुलगी म्हणून वाढविले. तिला काहीच कमी पडू दिले नाही, असे तिच्या मामाने सांगितले. जेव्हा तिचा व्हिसा करायची वेळ झाली तेव्हा आम्हाला न्यायालयातून तिच्या कायदेशीर पालकाचे प्रमाणपत्र आणायला सांगितले. त्यावेळी आम्हाला सर्वांनी सहकार्य केले व ते प्रमाणपत्र मिळविले, असे तिच्या मामाने सांगितले. जर बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास प्रवेश मिळाला तर नक्कीच पदक जिंकेन हा आत्मविश्र्वास होता, असे सियाने सांगितले.

सियाने एवढे यश प्राप्त केले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे तिची मामेबहीण योगीता नाईक सांगते. तिच्या यशस्वी वाटचालीला समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सर्वतोपरी मदत केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे नाईक कुटुंबीय सांगतात.

लहान असताना ती वालशे येथील सरकारी शाळेत शिकत होती. नंतर नाईक कुटुंबाला जाणीव झाली की तिला स्पेशल शाळेची गरज आहे व तिची काळजी खास पद्धतीने करावी लागेल. त्यामुळे त्यांनी तिला कुडचडे येथील संजय केंद्रामध्ये भरती केले.

सिया पॉवरलिफ्टिंगमध्ये उत्तम खेळाडू होईल याची चुणूक शिक्षिका गौतमी देसाई यांना लागली व त्यांनी तिला त्यामध्ये प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. सिया फुटबॉल, हॅंडबॉल व व्हॉलिबॉलचीही चांगली खेळाडू आहे, असे शिक्षिका गौतमी यांनी सांगितले. त्यामुळे सियाला नंतर सांगे येथील खासगी जीममध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तिची कामगिरी पाहून ती नक्कीच पदक जिंकेल याचा आम्हाला पूर्ण विश्र्वास होता, असेही शिक्षिका गौतमी यांनी सांगितले.

सांगे तालुक्यातील भाटी खेडेगावात राहणारी १७ वर्षीय सिया सरोदेने हंल्लीच बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकून गोव्यालाच नव्हे तर भारत देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र, तिचा हा प्रवास खडतर होता ...

जीवनामध्ये काहीही साध्य करता येते, केवळ आत्मविश्र्वास व सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य आवश्यक असते, हे सियाने सिद्ध करून दाखविले आहे,

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

सियाच्या कामगिरीमुळे आता इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल व यापुढे सियाकडून वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पेशल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीचा विश्र्वास आम्हाला आहे.

- व्हिक्टर वाझ, अध्यक्ष, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT