Blog: जादुई बोटांचा हार्मोनियम वादक

कलासागर सांस्कृतिक केंद्र शिरोडा संस्थेत 14 वर्षे त्यांनी हार्मोनियम शिक्षक म्हणून काम केल्यानंतर बोरी गावातील तामशिरे येथे 2002 साली त्यांनी श्री नवदुर्गा कलानंद या संगीत संस्थेची स्थापना केली.
Gokuldas Naik
Gokuldas NaikDainik Goamntak
Published on
Updated on

रमेश वंसकर

आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर गोकुळदास नाईक यांनी आपल्या आवडीच्या हार्मोनियम वादनाचे धडे घेतले. स्व. रमाकांत नाईक आणि रतनजी बेतकीकर या गुरूंकडून हार्मोनियम वादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांना लाभले. पुढे पं. तुळशीदास बोरकर, संदीप नागवेकर, सुभाष फातर्पेकर अशा नामवंत वादकांकडून हार्मोनियम वादनाचे शास्त्रशुध्द शिक्षण घेऊन अखिल भारतीय संगीत महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मिळविली.

अनेक भजनी व गायन स्पर्धांमध्ये कलाकारांना साथ करून त्यांनी अनेक पारितोषिके मिळविली आहेत. कलासागर सांस्कृतिक केंद्र शिरोडा संस्थेत 14 वर्षे त्यांनी हार्मोनियम शिक्षक म्हणून काम केल्यानंतर बोरी गावातील तामशिरे येथे 2002 साली त्यांनी श्री नवदुर्गा कलानंद या संगीत संस्थेची स्थापना केली आणि त्यात हार्मोनियम, तबला व गायनवर्ग सुरु केले. त्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यासाठी फार दूरवरून विद्यार्थी येत असतात.

गोकुळदास नाईक हे गेली कित्येक वर्षे शिवनाथी, शिरोडा येथील श्रीशिवनाथ मंदिरात नवरात्रौत्सवातील नऊ रात्री होणाऱ्या कीर्तनकारांच्या कीर्तनाला हार्मोनियम साथ करतात. या उत्सवाला महाराष्ट्रातून येणारे दिग्गज राष्ट्रीय कीर्तनकार गोकुळदास नाईक यांच्या हार्मोनियम साथीने प्रभावित होतात. पोवाडे, लावणी, भजन, नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत आदींना गोकुळदास यांची पूरक साथ असते.

Gokuldas Naik
Blog : माध्यमे, अभिव्यक्ती आणि विचार

हार्मोनियम वादन ही त्यांच्या बोटातली जादू आहे. त्यांच्याकडून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी हार्मोनियम वादनातील संगीत विशारद पदवी मिळवून आपल्या जीवनात स्थिरावले आहेत. राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या संगीत मैफली, साहित्य संमेलने, नाटके, कीर्तने, भजन आदी कार्यक्रमांना गोकुळदास नाईक यांना हार्मोनियम साथ करण्यासाठी निमंत्रित केले जाते. त्यांचा बहुतेक काळ विद्यार्थ्यांना हार्मोनियमचे शिक्षण देण्यातच जातो. हार्मोनियम जेव्हा गोकुळदास नाईक यांच्या जादुई बोटांनी जिवंत होऊन गाऊ लागते ती गाणाऱ्याला आणि गाणी ऐकणाऱ्याला अनाहत आनंद देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com