Rati Bhatikar Dainik Gomantak
ब्लॉग

Film industry: यशस्वी अभिनेता बनण्यासाठी प्रयोग करत राहणे हाच फॉर्म्युला - रती

इच्छुक कलाकारांनी शिकत राहणे, गोव्याबाहेरच्या कार्यशाळांना देखील उपस्थित राहणे गरजेचे आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील प्रतिभावान दिग्दर्शक आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांकडून अनेक चांगल्या सिनेमा निर्मिती होताना दिसत आहेत. काही विलक्षण दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचे भाग्यही मला लाभले आहे.

मी मुंबईत वाढले पण अभिनयाची संधी मला गोव्यातच प्राप्त झाली- नाटक, लघुपट, सिनेमा जाहिराती अशा अनेक माध्यमातून!

एक कलाकार म्हणून जेव्हा मी पाहते की गोवा आणि मुंबईच्या कलाकारांना वेगवेगळी वागणूक दिली जाते तेव्हा मला फार खंत वाटते. मानधनाच्या बाबतीतही गोव्यातील कलाकारांना फारच कमी मोबदला दिला जातो.

व्यावसायिक निर्मितीसाठी काम करताना मी चांगल्या मोबदल्याची अपेक्षा अवश्य करते पण कोणी आपल्या उत्कट आवडीने किंवा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सिनेमा बनवत असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी विनाशुल्क काम केले आहे. कारण तिथे समर्पण आणि काहीतरी चांगले बनवण्याचा निग्रह मी पाहू शकते.

मला प्रकर्षाने वाटते की गोव्यात अनेक चांगले नवोदित कलाकार आहेत. व्यावसायिक कास्टिंग एजन्सीने अशा कलाकारांना पाठबळ दिले पाहिजे तसेच त्यांना चांगला मेहनताना मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे.

जर गोव्यातील एखादा अभिनेता संपूर्णपणे या उद्योगावर अवलंबून राहायला पाहत असेल तर ते कठीण असेल. आपल्या अस्तित्वाच्या शाश्वततेसाठी त्याने अभिनयाबरोबर इतर विभागांतही काम करणे आवश्यक आहे. मी अनेक चांगल्या कलाकारांना तसे करताना पाहिले आहे.

लिंगाच्या आधारावर कलाकारांमध्ये फरक असावा असे मला वाटत नाही. गोव्यात कलाकारांना चांगला आदर मिळतो. इच्छुक कलाकारांनी शिकत राहणे, गोव्याबाहेरच्या कार्यशाळांना देखील उपस्थित राहणे गरजेचे आहे.

कामासाठी त्यांनी नेहमीच तत्पर असले पाहिजे. सिनेमा हा सहज घेण्यासारखा उद्योग नाही. चांगला किंवा यशस्वी अभिनेता बनण्यासाठी विशिष्ट फॉर्म्युला नाही. त्यात प्रयोग करत राहणे हेच महत्त्वाचे आहे.

रती भाटीकर, अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT