Goa: मदर मेरीच्या ‘गृहिताच्या मेजवानी’च्या तयारीसाठी रोवले जाते शेत, कुठे ते माहितीये का?

या शेतातले भाताचे पहिले कणीस धर्मगुरूकडून आशीर्वादित करून सर्व रहिवाशांना वितरित केले जाते.
Agricultural
Agricultural Dainik Gomantak
Published on
Updated on

Agricultural मडगाव येथील होली स्पिरिट चर्चशी निगडित असलेल्या तरुण आणि रहिवाशांनी माडेल येथील जुन्या मार्केट सर्कल जवळील शेती बांधावर मशागतीचे काम सुरू केले. चर्चच्या फादरनी या उपक्रमात सहभागी असलेल्यांसाठी प्रार्थना केली आणि लावणी सुरू झाली. अनेक युवक युवतीं लावणीचा धडा पहिल्यांदाच गिरवित होते. 

शेतीत रस घेत घेणाऱ्या उत्साही तरुणाईचे फादर मॉविन फर्नांडिस यांनी कौतुकही केले. कृषितज्ज्ञ सायमन मिरांडा म्हणाले, मागील 13 वर्षांपासून या जागेत पीक घेतले जाते. मडगाव शहराच्या मध्यभागी असलेला हा बंधारा जणू मरुभूमीतील हिरवाई आहे.’

Agricultural
International Widows Day : "गोव्यातील विधवा स्त्रियांची पराकाष्ठेची निष्ठूर प्रथा बंद व्हावी हीच प्रार्थना"

15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मदर मेरीच्या ‘गृहिताच्या मेजवानी’च्या तयारीसाठी हे शेत रोवले जाते. या शेतातले भाताचे पहिले कणीस धर्मगुरूकडून आशीर्वादित करून सर्व रहिवाशांना वितरित केले जाते.

होली स्पिरिट पॅरिशचा युवक राहुल परेरा बोलताना म्हणाला, ‘भात लावण्याची आणि चिखलात हात घालण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मात्र त्यामुळे मला निसर्गाशी एकरूप झाल्यासारखे वाटले. असे उपक्रम तरुणांना सक्षम बनवतात. बऱ्याच वर्षांनी मी समुदायात काम करतो आहे.’

जॉयस्टन कोस्टा या आणखी एका होली स्पिरिट पॅरिश युवा सदस्याचे म्हणणे होते, ‘तरुण पिढीने शेतीत रस घेतल्यास गावातील शेती करण्याची परंपरा कायम राहू शकते’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com