Omicron Dainik Gomantak
ब्लॉग

ओमिक्रॉनमुळे पूर्ण विश्व 'हाय अलर्ट'वर

एका विषाणूने जगभरांतील मानवी व्यवहार एक दोन दिवस वा महिने नव्हे तर तब्बल दीड दोन वर्षे ठप्प करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

दैनिक गोमन्तक

Omicron: कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमिक्रॉनबाबत सध्या सारे जग हाय अलर्टवर ठेवले गेले आहे. विविध देशांनी आंतरराष्ट्रीय (International) प्रवाशांवर (Passengers) नवे निर्बध लागू केले आहेत. एका विषाणूने जगभरांतील मानवी व्यवहार एक दोन दिवस वा महिने नव्हे तर तब्बल दीड दोन वर्षे ठप्प करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे व त्यामुळे कोरोना हा शब्द जरी कुणी उच्चारला तरी साहजिकच काळजात धस्स होण्याचे वा कान टवकारले जाण्याचे प्रकार अजूनही चालू आहेत.

त्यामुळे दोन अडीच वर्षांनंतर जरा कुठे जनजीवन वा मानवी व्यवहार सुऱलित होऊं लागत असतानाच या ओमिक्रॉनचे (Omicron variant) वृत्त थडकले व अनेक राष्ट्रांनी आणखी विषाची परीक्षा नको या हेतूने निर्बध लादले आहेत.

आपल्या भारतानेही त्याबाबत सावधगिरी घेताना सर्व राज्यांच्या प्रशासनांना त्या संदर्भात सतर्क केलेले आहे. अजून जरी सर्वसाधारण निर्बंध लादलेले नसले तरी एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन ते लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरे म्हणजे तसे ते लादले गेलेच तर त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची ती व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय जबाबदारी राहील. कारण आपले गोवा असो वा अन्य कोणी असो पण त्यांनी कोरोनाच्या सुरवातीच्या काळांत केंद्र सरकार वा आरोग्य संघटनांनी दिलेले इशारे गांभीर्याने तर घेतले नाहीच पण त्याच बरोबर त्याकडे दुर्लक्ष केले व शेवटी तेच आम्हांला महागांत पडले हे वास्तव असून त्यावरून यावेळी तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

कोरोनाचा गेल्या दोन वर्षाचा प्रसार पाहिला तर सणा –उत्सवानंतर तसेच काही निवडणुकांनंतर रुग्णांची–बळी गेलेल्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. विरोधी पक्ष व इतरांनी त्याबद्दल सरकारला दोष दिला पण सरकार सरकार म्हणजे शेवटी कोण तर आपणच निवडून दिलेली माणसे आहेत हे आपण पाहिले नाही. आता आपल्या गोव्यातील (Goa) सध्याचेच पहा कोविड संसर्ग घटल्यानंतर बरेच निर्बंध घटविलेले असले तरी मुखपट्टी, सुरक्षित अंतर वगैरेसारखे निर्बंध लागूच आहेत पण किती जण ते पाळतात, बऱ्याच प्रमाणात प्रवासी बसवाहतूक सुरु झालेली असली तरी प्रवाशांना मुखपट्टी सक्तीची आहे पण प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच आहे. बसवाहक व चालक मात्र ते पथ्य पाळतात.

बाजारात, विशेषतः मासळी बाजारात मात्र आनंदीआनंद आढळून येतो. तेथे विक्रेते, हमाल व ग्राहकांनाही कसलेच निर्बध नाहीत सगळा खुल्लम खुल्ला व्यापार. यांतून काय साध्य होणार, पोलिस यंत्रणा मुखपट्टी व शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीवाल्यांच्या पाठीशी हात धुऊन लागते ते त्यांचे तालावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अन्यथा बाजारात वा अन्यत्र अशा प्रकारे वावरणाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली असती, पण तसे केले तर विविध संघटना पोलिसांवर छळवादाचा आरोप करतात यामुळे यंत्रणा त्याकडे काणाडोळा तर करत नाही ना असा संशय येतो.

पंधरवड्या मागे शेजारच्या बेळगावला जाण्याचा योग आला तेथील बाजारपेठेची व सार्वजनिक स्थळांवरील एकंदर स्थिती पाहिली तर आपला गोवा परवडला असे म्हणावे लागते. नाही म्हणायला सीमा ओलांडतांना लसीकरणाची (Vaccination) कागदपत्रे तपासली जातात पण त्यातून काय होणार, विविध निर्बधाबाबत विशेष करून लोकांमध्ये उदासीनता वा बेफिकीरपणा कशासाठी असा प्रश्र्न पडतो. कारण शेवटी हे सारे निर्बध तुम्हा आम्हांच्या सुरक्षिततेसाठी आहेत,पण नेमके त्याकडेच आपण दुर्लक्ष करत असतो.

गोव्यात तर सध्या निवडणुकीची घोषणा झालेली तरी तिची धामधूम सुरू झालेली आहे. या निमित्ताने विविध पक्ष कार्यकर्ते वा समर्थकांचे मेळावे भरवीत आहे व त्याला तुफान गर्दी लोटते साहजिकच त्यात कोणीच निर्बंध पाळत नाहीत. पण ओमिक्रोनमुळे हे दुर्लक्ष महागांत पडण्याची शक्यता नाकारतां येत नाही.

कोरोनाचा भूतकाळ व त्यामुळे वर्ष दीडवर्ष आपण जे काय सहन केले, भोगले त्याची पुनरावृत्ती नको असेल तर आताच खबरदारी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी रहाणार आहे, हे जितक्या लवकर आपण उमजूं तितके ते आपल्याच फायद्याचे ठरणार आहे.

- प्रमोद प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT