दीड दशकानंतर कोकणी साहित्य दालनात ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे पदार्पण

मावजो यांनी आपल्या कथा आणि कादंबरीतून सातत्याने चिरंतन मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे.
Jnanpith Award
Jnanpith Award Dainik Gomantak
Published on
Updated on

मावजो (Mauzo) यांच्या साहित्यावर मी विशेष काही भाष्य करू इच्‍छित नाही. त्यांच्या साहित्याचा (Literature) अनुवाद देश-विदेशांतील जवळजवळ अठरा भाषांतून (Language) झालेला आहे. जागतिक पातळीवरून त्यांच्या साहित्याची चर्चा होत आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास विद्यापीठ स्तरावरूनही होत आहे. दीड दशकापूर्वीच्या काळात जर एखाद्याने कोकणी साहित्यास ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त होईल असे भाकीत केले असते तर ‘मुंगेरीलाल के हसिन सपने’ संबोधून त्याची टर उडविली असती.

Jnanpith Award
कोकणीतले नामवंत साहित्यिक दामोदर मावजो ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी

कारण कोकणी ही भाषाच नव्हे, त्या भाषेतील साहित्य हे साहित्यच नव्हे, जे काही खरडले जातेय ते दर्जाहिन, असे काहीबाही बरळणारे सूर्योदय मान्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. साहित्य अकादमीने कोकणी भाषेला साहित्यिक भाषा म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावेळीही हाच आक्रोश होता. परंतु जिद्दी आणि कर्तृत्‍वी कोकणी माणसाने अल्पावधीत भाषाविषयक सगळे निकष पूर्ण करून आपल्या भाषेला देशातील (Country) इतर समृद्ध भाषेच्या पंगतीत विराजमान केले.

साहित्य अकादमी पुरस्काराचे कवाड कोकणी साहित्यासाठी सताड उघडे केले. बहुतेकांची कल्पना होती कोकणीची धाव इथपर्यंतच. परंतु रवींद्र केळेकर यांनी ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचाही (Jnanpith Award) बुलंद दरवाजा आपल्या कर्तृत्वाच्या आणि अक्षर साहित्य (Literature) निर्मितीच्या बळावर कोकणी साहित्यासाठी उघडला. विरोधकांना वाटले असावे हा प्रकार अपघाती घडलेला असावा. हा पुरस्कार कोकणीसाठी पहिला आणि अंतिम ठरणार! दर्जात्मक साहित्यकारांची या भाषेत उणीव आहे. परंतु जेव्हा कोकणी साहित्यासाठी सरस्वती सन्मान चालून आला तेव्हा कित्येकांच्या भुवया उंचावल्या आणि आता फक्त दीड दशकानंतर पुन्‍हा एकदा आज कोकणी साहित्य दालनात ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने पदार्पण केले तेव्हा हा प्रवाह अखंडपणे सुरू राहील याची ती ग्वाहीच म्हणावी लागेल.

Jnanpith Award
'न भुतो न भविष्यती' आसामने दिला जगाला कवितेतून संदेश!

रवीन्द्र केळेकर यांना २००६ साली ज्ञानपीठ पुरस्कार (Award) मिळाला. कोकणी साहित्य वर्तुळात तोपर्यंत ते एक स्वप्नच होते. सदर पुरस्कारासाठी आवश्यक तांत्रिक बाबी कोकणीत उपलब्ध नव्हत्या. कारण त्या अनुषंगाने कोकणी भाषा कार्यरत नव्हती. कोकणीची संपूर्ण शक्ती कोकणीच्या विकासासाठीच संपत होती. परंतु केळेकरांना खात्री होती, कोकणी साहित्य हे केवळ इतर भाषांतील साहित्याच्या तोलामोलाचेच नव्हे तर त्यापेक्षा वरच्या स्तराचे आहे. तेव्हा कोकणीस ज्ञानपीठच नव्हे तर नोबेलसुद्धा मिळणे अशक्य नाही. आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार याची त्यांना तसूभरही खात्री नव्हती. कारण त्याकाळी पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया वेगळी होती. याची कल्पना केळेकरांना होती. म्हणून ते नेहमीच म्हणायचे, कोकणी साहित्यास ज्ञानपीठ पुरस्कार नक्कीच लाभेल.

भाई ऊर्फ दामोदर मावजो हे कोकणीतील चतुरस्र साहित्यकार. कथा आणि कादंबरी हा त्यांचा साहित्यसृजनाचा प्राण. त्यांनी आपल्या साहित्यातून वास्तव जीवनाचे बारकाईने चित्रण कलेले आहे. परंतु एवढ्यासाठीच त्यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली असे म्हणण्याचे धाडस मी नक्कीच करणार नाही. भाई मावजो यांनी आपल्या कथा आणि कादंबरीतून सातत्याने चिरंतन मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्यांचे साहित्य सार्वत्रिक आणि वाचकप्रिय ठरण्यामागचे हेच मुख्य कारण आहे.

● दिलीप बोरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com