Damodar Mauzo Get 57th Jnanpith Award Dainik Gomantak
ब्लॉग

गोवा मुक्ती हीरकमहोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर 'कोकणी साहित्याला' मानाचा तुरा..

कोकणी साहित्याला उभारी देणारी घटना

Dainik Gomatntak

गोवा (Goa) आपल्या मुक्तीचा हीरकमहोत्‍सव साजरा करत असताना दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार (57th Jnanpith Award) जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणी भाषेला (Konkani writer) हा पुरस्‍कार प्राप्त व्हावा याला विशेष महत्त्व आहे. 1961 नंतर कोकणी साहित्यात नव्या युगाला प्रारंभ झाला व त्याची ही फलश्रुती आहे.

मावजो यांनी 1963-64 च्या दरम्यान कथा, लेखनाला सुरूवात केली. त्यांची ‘मरण येता म्हूण’ ही कथा ‘नवे गोंय’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली व कोकणीप्रेमी, वाचकांचे लक्ष मावजोंकडे वेधले गेले. या कथेतील पात्र म्हणजे जे एक पाणसाप. कोकणीतले ‘हेवाळे’. अशा विषयावरसुद्धा एखादी कथा लिहिली जाऊ शकते याचे भान वाचक व लेखकांनाही आले. रुपकवजा ही कथा एक वेगळीच उंची गाठते. या कथेचा अनुवाद अनेक भाषांमध्‍ये झाला आहे. साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेल्या भारतीय कथेच्या खंडात या कथेचा इंग्रजी अनुवाद समाविष्ट झाला आहे.

‘गांथन’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह कोकणी कथेच्या इतिहासासंदर्भात मोलाचा ठरतो. त्‍यांच्या कथेतील पात्र त्याची ग्वाही देतात.

‘कार्मेलिन’ ही त्यांची बहुचर्चीत कादंबरी ख्रिश्‍‍चन समाजाच्या दुसऱ्या अंगावर बोट ठेवते. डॉ. नरेश कवडी यांच्‍यासारख्या नामवंत कथाकार व समिक्षकाने तिचा सुंदर मराठी अनुवाद केला असून त्‍यास साहित्य अकादमीचा पुरस्कार, मिळाला आहे. या कादंबरीचा अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्‍ये झालेला आहे. ही आपली अत्यंत आवडती कादंबरी आहे असे ध्रुव हजारिका या आसामिया लेखकाने म्हटले आहे. अनुवादामुळ ही कादंबरी भारतीय वाचकांपर्यंत पोचली. हे त्यांचे वैयक्तिक यश आहे. परंतु या कादंबरीमुळे कोकणी साहित्याची ओळख भारतीय वाचकाला होते ही गोष्ट विसरता कामा नये. सदर कादंबरीवर काही आक्षेप घेण्यात आले, पण ते किती ठिसूळ होते याची प्रचिती काळानेच दिली. पात्रचित्रण व ओघवती भाषा हे या कादंबरीच्‍या यशाचे गमक म्हटले पाहिजे.

समाजशास्त्र अभ्यासकाला या कादंबरीत मोलाची सामग्री मिळू शकते. त्‍यांच्‍या कथाही व्यक्तीच्या एकटेपणाचा वेध घेणाऱ्या आहेत. नातेसंबंधांच्या विणेची उकल करणाऱ्या अशा अनेक कथा मावजो यांनी लिहिल्या आहेत. प्रामुख्याने ‘च्या मारु काय जीव दिवं?’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. आशय व तंत्र या दोन्ही दृष्टीने ती वेगळी ठरते. गाब्रिएल गार्सीया मार्क्वझ हा मावजो यांचा आवडता लेखक. मावजो यांनी भरपूर प्रवास केला. युरोप, अमेरिका, न्यूझीलंड, आखाती देश ते डोळसपणे पाहून व अनुभवून आले आहेत. लेखकाने प्रवास केला पाहिजे. त्याचप्रमाणे वाचन हा त्याच्या साधनेचा भाग असतो, यावर त्यांची श्रद्धा आहे. लेखक हा व्यवस्थेचा एक घटक असल्यामुळे सामाजिक, राजकीय प्रश्‍नांकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही या जाणिवेतून त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले व ते ‘इंक ऑफ डिसेंट’ या नावानं प्रसिद्ध केले आहेत. अशा या हरहुन्नरी व्‍यक्तिमत्‍वाचे अभिनंदन.

माधव बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT