Assembly Election 2023  Dainik Gomantak
ब्लॉग

Assembly Election 2023 : लोकसभेची सेमी फायनल ‘मोदी गॅरंटी’ने जिंकली

Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात नेत्रदीपक यश मिळवले. तेलंगणा राज्यातही पक्षाने चांगली कामगिरी करून दाखविली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

संदेश साधले,

अवघ्या चार-पाच महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांत व आश्चर्यकारकरीत्या छत्तीसगडमध्येही भाजपने मारलेल्या बाजीने २०२४मध्ये लोकसभेचा कौल काय व कसा येणार, याची चुणूक दाखवली आहे.

तेलंगणातील विजय साजरा करण्याचीही उर्मी उरू नये, इतका हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा आहे.

दे शातील नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात नेत्रदीपक यश मिळवले. तेलंगणा राज्यातही पक्षाने चांगली कामगिरी करून दाखविली आहे.

या राज्यातील जनतेने ''मोदी गॅरंटी'' वर विश्वास ठेवून पंतप्रधान मोदी यांच्यावरील प्रेम अढळ असल्याचे सिद्ध केले. विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी तमाम भारतीयांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर असलेला विश्वास तसूभरही कमी झाला नसल्याचे अधोरेखित झाले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट- तानावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगढ राज्यात प्रचार केला होता.

मुख्यमंत्री डॉ. सावंत, आरोग्यमंत्री राणे आणि खासदार शेट- तानावडे या राज्यातील निवडक मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या होत्या. गोव्यातील या तिन्ही मातब्बर नेत्यांनी प्रचार केलेले बहुतांश उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे तिन्ही राज्यातील यशात गोव्याचाही बहुमोल वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढनिश्चय, भारतीय राजकारणातील ''चाणक्य'' मानल्या जाणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचे नेटके नियोजन, दूरदृष्टी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे कुशल नेतृत्व या त्रिवेणी संगमातून पक्षाने या राज्यात ''न भूतो'' अशी कामगिरी केली आहे. अर्थातच याला जोड होती ती भाजपाच्या तमाम पदाधिकारी, राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेते, कार्यकर्ते तसेच पक्षाच्या मजबूत संघटनेची.

पोकळ आश्वासने आणि भाषणबाजीपेक्षा जो काम करील, तोच राज्य करील, ही उक्ती या तिन्ही राज्यातील जनतेने सार्थ ठरवली आहे. चार मोठ्या- राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसविरुद्धचा थेट सामना

३-१ असा जिंकून भाजपाने हॅटट्रिक केली आहे. तसेच आपल्या राजवटीखालील राज्यांची संख्या १२वर नेली आहे.

डणुकीआधी मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांत व आश्चर्यकारकरीत्या छत्तीसगडमध्येही पक्षाने मारलेली बाजी २०२४मध्ये लोकसभेचा कौल काय व कसा येणार याची चुणूक दाखवली आहे. तेलंगणतील विजय साजरा करण्याचीही उर्मी उरू नये, इतका हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे.

तिन्ही राज्यांत महिला, शेतकरी व तरुण वर्गाची भाजपला भरभक्कम साथ, डबल इंजिन सरकारचा युक्तिवाद जनतेला पटणे, केंद्र-राज्य नेतृत्वांतला समन्वय ही भाजपच्या यशाची ठळक कारणे आहेत.

प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण ही तीन राज्ये काँग्रेसच्या हाती जातील आणि राजस्थान हे एकमेव भाजपकडे जाईल, अशी राजकीय विश्लेषकांची अटकळ होती. मात्र, प्रचाराचा ज्वर वाढू लागला तसे भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही प्रचाराची तीव्रता वाढवली.

मोदी आणि अमित शहा यांच्या सभांचा धडाका, नियोजनबद्ध प्रचार आणि सरकारी योजनांची प्रसिद्धी यांच्या मदतीने भाजपने या दोन्ही राज्यांत विजयाची पार्श्वभूमी तयार केली. त्यामुळेच एकाचा अपवाद वगळता अन्य मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज काँग्रेसच्या बाजूने झुकले असताना प्रत्यक्षात मात्र, २३० पैकी १६३ जागांसह भाजपने दोन तृतियांश बहुमत मिळवले.

या पाच राज्यांतील लोकसभेच्या जागांची संख्या ८३ होते. हे निकालच लोकसभेचा कौल ठरणार, असे वाटणे स्वाभाविक आहे. तरीही हे राजकारण आहे, याची जाणीव असल्याने येथे मतदारांना गृहीत धरण्याची चूक नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप कदापि करत नाही.

त्यामुळेच भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात, ''अब लोकसभा की तैयारी करनी है,'' हीच भावना प्रत्येक नेत्याच्या देहबोलीत स्पष्ट दिसत होती. लोकसभेतही ४००हून अधिक जागांसाठी डबल इंजिनचा जोर लावायचा आहे, हा ''अंडरकरंट'' दीनदयाळ उपाध्याय मार्गावर स्पष्ट जाणवत होता. आगामी काळात ''मोदी की गॅरंटी'' हेच भाजपचे ब्रह्मवाक्य ठरेल.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची शेवटची ‘लढाई’ समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भाजपाचे बळ आणखी वाढवले असून काँग्रेसला उत्तर भारतातून जवळपास हद्दपार केले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी की गॅरेंटी है’ अशा शब्दांत साद घालणाऱ्या पंतप्रधानांना मतदारांनीही दाद दिली.

मध्य प्रदेशमध्ये ‘मोदी हमी’सोबत ‘लाडली बहना’ योजना असा योग भाजपला दोन तृतियांश बहुमताकडे घेऊन गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव मतदारांवर असल्याचे या निकालांनी स्पष्ट झाले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तो कायम राहील आणि देशात तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

Rakul Preet Singh At IFFI: '..पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही'; रकुलप्रीतने Nepotism बद्दल मांडले स्पष्ट मत

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

SCROLL FOR NEXT