गोव्यातील अंजुणेचे 'फ्ली मार्केट' अद्भुत विश्व  Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील अंजुणेचे 'फ्ली मार्केट' अद्भुत विश्व

‘फ्ली मार्केट’ (Flea Market) हे त्या जागेत अवतरलेले एका दिवसाचे अद्भुत विश्व असते.

दैनिक गोमंतक

अंजुणे (Anjune) येथे भरणाऱ्या साप्ताहिक ‘फ्ली मार्केट’चे (Flea Market) आकर्षण पर्यटकांना (Tourist) विशेष असते. ऐसपैस जागेत वेगवेगळ्या रंगीत आणि आकर्षक (Attractive) वस्तूनी सजलेले स्टॉल (Stall) आठवड्यात एकाच दिवशी तिथे एकदम बहरून येतात आणि अंजुणेच्या शेतांमधली ती मोकळी जागा त्या दिवसभर कॅलिडोस्कोप बनून आपल्या इच्छांना सारखी सुखावत राहते.

गोव्यात (Goa) साठ आणि सत्तरच्या दशकात आलेल्या हिप्पीनी ‘फ्ली मार्केट’ (Flea Market) ला जन्म दिलेला असला तरी त्यानंतरच्या काळात भारतीय (India) हस्तकला कारागीरांसाठी हे मार्केट (Market) त्यांच्या कलाकृतींचे एक गर्दीचे विक्री केंद्र ठरले आहे. पूर्वी हिप्पी किंवा परदेशी पर्यटकांची गोव्यातला (Goa) त्यांचा दीर्घ निवास आटोपून पुन्हा आपल्या देशी परतायची वेळ यायची, तेव्हा ते त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त वस्तू ह्या ठिकाणी एकत्र येऊन विकायचे. सुरुवातीचे ‘फ्ली मार्केट’ (Flea Market) हे परदेशी विक्रेत्यांनी भरलेले असायचे. मात्र सरत्या वर्षानिशी हळूहळू या मार्केटमध्ये (Market) भारतीयांनीही (India) आपल्या वस्तू मांडून त्यांची विक्री करायला सुरुवात केली.

‘फ्ली मार्केट’ (Flea Market) मध्ये दिसणाऱ्या वस्तू स्थानिक बाजारात सहसा मिळत नाहीत. तिथे असणारे कपडे, अलंकार, वाद्ये इत्यादींच्या रचनेत कमालीची आकर्षकता असते. त्यामुळे तिथे फिरताना एका वेगळ्या प्रकारच्या मोहमयी गल्लीतून फिरत असल्याचा भास होत राहतो. मन सतत ललचावत राहते. तिथे असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल, फेसाळणारी बियर, संगीत (Music) या गोष्टीही तिथे सारल्या जाणाऱ्या वेळेचे भान हरवायला कारणीभूत होतात. ‘फ्ली मार्केट’ (Flea Market) हे त्या जागेत अवतरलेले एका दिवसाचे अद्भुत विश्व असते.

कोरोना काळात (Corona) मात्र या विश्वाचा विलय झाला. गेले दीड वर्ष ही जागा सुनीसुनी राहिली. मात्र आता गोव्यात (Goa) पर्यटन (Tourist) मोसम पूर्ववत् आकार घेत असल्याची चिन्हे सुदैवाने दिसत आहेत आणि तिथले ‘फ्ली मार्केट’ पुन्हा सुरू करण्याचा अर्ज अंजुणे गावच्या पंचायतीकडे दाखल झाला आहे. अंजुणे गावचे सरपंच म्हणतात, गोवा (Goa) पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सारीकडेच दिसते आहे. अशावेळी आपल्या गावचे हे जगप्रसिद्ध ‘फ्ली मार्केट’ (Flea Market) खुले होऊ नये याचे कोणतेही कारण दिसत नाही.

आता सरकारने (Government) परवानगी दिल्यास अंजुणेचे ‘फ्ली मार्केट’ (Flea Market) पुन्हा एकदा त्या जागेवर आपल्या सार्‍या रंग-विभ्रममानिशी अवतरेल. आपल्या डोळ्यांत विस्मय घेऊन पर्यटक (Tourist) तिथल्या दर एका स्टॉलपाशी थबकतील. घासाघिसीचा आनंद लुटतील आणि तिथे असलेल्या अगोचर सुखसंवेदनात हरवून जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT