Anagha Sambari is the winner of Mrs. India pageant organized by KGM Dream Entertainment in Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa: एका स्त्रीचे जिंकणे

‘स्त्रीची महानता कशात असते?’

दैनिक गोमन्तक

तिला आवड होतीच आणि तिच्या मनात सुप्त इच्छाही होती की आपण ‘रॅम्पवॉक’ कधीतरी करावा. तिला आत्मविश्‍वासही होता. या आत्मविश्‍वासामुळे साखळी या आपल्या लहानशा गांवात होणाऱ्या ‘मिसेस साखळी’ या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि ती त्या स्पर्धेची दुसरी उपविजेती ठरली. पाऊल अगदी लहानसेच होते मात्र त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास दुणावला . तिने चक्क ‘मिसेस इंडिया’ बनण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली. मिसेस इंडिया स्पर्धा (Mrs. India Competition) अनेक आयोजकांमार्फत आयोजित होत असतात. ‘केजीएम ड्रीम एंटरटेंनमेंट’ या संस्थेने गोव्यात आयोजित केलेल्या ‘मिसेस इंडिया’ (Mrs. India) स्पर्धेबद्दल जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने वेळ न दवडता लगेच आपलं नाव नोंदवून टाकलं.

या स्पर्धेच्या ऑडिशनसाठी मुंबई, पुणे, बेंगलोर सारख्या शहरातून आलेल्या स्पर्धकही होत्या. एकदंर 200 स्पर्धकांचा मेळावा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी भरला होता. त्यातून फक्त 15 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. त्यात तिचा अर्थातच समावेश होता. त्यानंतर होणारी अंतिम फेरी आर्पोरा येथील ‘प्राईड सन विलेज’ रिसॉर्टमध्ये येथे पार पडणार होती. आयोजकांनी या अंतिम फेरीतील साऱ्या स्पर्धकांचे ‘ग्रूमिंग’ काटेकोरपणे केलं होतं. ऑनलाईन प्रशिक्षणातून चालावे कसे, टेबल ॲटीकेट्स, त्वचेची निगराणी कशी घ्यावी इत्यादी बाबींवर तज्ज्ञ आणि न्युट्रिशिन्समार्फत सल्ला दिला जात होता.

या सौंदर्यस्पर्धेची थिम होती, ‘स्टॉप डाॅमेस्टिक व्हायलेन्स’. स्त्रियांनी आपले कर्तृत्व केवळ घरात न दाखवता बाहेरच्या जगातही प्रभावीपणे दाखवायला हवे तरच स्त्रिया अधिक बलशाली होऊ शकतील हा विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे होता. स्पर्धेच्या तीन फेऱ्या होत्या. पहिल्या दोन्ही फेऱ्यांत परीक्षकांवर प्रभाव टाकणाऱ्या तिला तिसऱ्या फेरीत प्रश्‍न विचारला गेला, ‘स्त्रीची महानता कशात असते?’ या प्रश्‍नाला तिचे उत्तर होते, ‘स्त्री ही मुळात करुणामय असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जन्म द्यायची ताकद फक्त स्त्रीपाशीच असते.’’ या उत्तराने ती जिंकली आणि परीक्षकांनी निर्णय एकमुखाने दिला.‘‘या मिसेस इंडिया सौंदर्यस्पर्धेची विजेती आहे, अनघा सांबारी!’’

अनघा सांबारी!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT