कायदा अन् सुव्यवस्थेशिवाय 'लोकशाही' अयशस्वी: Amit Shah

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मारक केले आहे.
Amit Shah
Amit Shah Dainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (Police Research and Development)चा 51 वा स्थापना दिन दिल्ली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती होते. या कार्यक्रमामध्ये टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) रौप्यपदक विजेती व मणिपूर येथील पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) (क्रीडा) (Sport) असणाऱ्या मीराबाई चानू (Mirabai Chanu) यांचा सन्मान करण्यात आला.

Amit Shah
Narayan Rane: देश कायद्याने चालतो हे सिध्द झालं

दरम्यान अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकशाही (Democracy) हा भारताचा स्वभाव राहिला आहे, आणि तो कायदा आणि सुव्यवस्थेशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. भारताने राज्यघटना स्वीकारल्यानंतर लोकशाही आली असे जर वाटत असेल तर ते पूर्णतः चुकीचे आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था उत्तम नसेल तर लोकशाही ही यशस्वी होऊ होणार नाही. पूर्वी गावांमध्ये 'पंच परमेश्वर' असत तसेच हजारो वर्षांपूर्वी द्वारकेमध्ये यादवांचे राज्य होते. यामुळे लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा राहिला आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस (police)करत असतात. त्यामुळे त्यांचे काम सगळ्या क्षेत्रांचा विचार केल्यास सर्वात कठीण काम आहे.

एखादी संस्था जर आपल्या क्षेत्रात 51 वर्षांपर्यंत प्रतिष्ठा निर्माण करून आणि टिकवून ठेवू शकत असेल तर ते त्यांच्या कार्यामध्ये प्रतिष्ठा आणि सामर्थ्य दोन्ही सांभाळू शकतात. तसेच गेल्या 75 वर्षांत देशात 35 हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. याचीच दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोलीस स्मारक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com