Paytm Payments Bank Dainik Gomantak
अर्थविश्व-

Paytm च्या शेअरमध्ये तेजी, स्टॉकमध्ये 13 टक्क्यांपर्यंत वाढ

पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या 4 महिन्यांतील सर्वात मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

Paytm News : देशात जेव्हा पेटीएमची सुरूवात झाली तेंव्हा एक एक वाक्य सगळ्यांच्याच तोंडात होते... Paytm करो. मात्र पेटीएम लिस्ट झाल्यापासून हा शेअर घसरत असल्याने अनेकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आतापर्यंत, Paytm च्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर मार्केट कॅपमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. त्यातच बुडत्याला काडीचा आधार या प्रमाणे पेटीएमच्या शेअर धारकांसाठी चांगली बातमी आली असून पेटीएमच्या मालकीच्या One97 Communications लिमिटेडच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसत आहे. तर ट्रेडिंगमध्ये सुमारे 13 टक्क्यांपर्यंतची वाढ आहे. ही 4 महिन्यांतील सर्वात मोठी आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये13 टक्क्यांच्या वाढसह शेअर्स हे 592.40 रुपयांपर्यंत गेले आहेत. तर याच शेअर्सची किंमत गेल्यावेळी 578 रुपये होती. जी 11 टक्क्यांवर होती. (Shares of Paytm have risen 13 per cent in the last four months)

Dolat Capital ने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोटमध्ये, आरबीआयने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला (Bank) नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखल्यामुळे, कंपनीवर थोडासा परिणाम झाला आहे. तर ब्रोकरेज फर्म Macquarie ने स्टॉकची टार्गेट प्राईज 39 टक्क्यांनी कमी करून 450 रुपये केली आहे.

दरम्यान पेटीएमच्या (Paytm) मालकीच्या One97 Communications लिमिटेडकडून बीएसईने शेअरमधील तीव्र घसरणीबद्दल स्पष्टीकरण मागवले होते. पेटीएमने बुधवारी बीएसईच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यात कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, कंपनी आणि तिचा व्यवसाय पूर्णपणे मजबूत आहे. वेळोवेळी ते बीएसईला सर्व आवश्यक माहिती देण्यात येईल. तर बिझनेस फंडामेंटल मजबूत असून हे 4 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

SCROLL FOR NEXT