Income tax return Dainik Gomantak
अर्थविश्व-

Income Tax Return: .. तर अशी हुशारी महागात पडणार; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा इशारा

Income Tax Return: आयकर कायद्यांतर्गत अधिकारी सहा वर्षांपेक्षा जुनी प्रकरणे पुन्हा उघडू शकतात.

दैनिक गोमन्तक

Income Tax Return: कर वाचवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण वेगेवगळे मार्ग काढताना दिसतात. मात्र अशी हुशारी महागात पडू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सुमारे एक लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याचे वक्तव्य केले आहे.

ITR भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै जवळ येत असल्याने करदात्यांना चेतावणी देण्यात आली आहे. ज्यांना नोटीस पाठवली आहे त्यापैकी अनेकांनी त्यांचे उत्पन्न लपवले होते. हे रिटर्न चार ते सहा वर्षे जुने आहेत आणि आयकर विभाग 31 मार्च 2024 पर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढणार असल्याचेही म्हटले जात आहे.

आयकर विभाग सर्व प्रकरणे पारदर्शक आणि जबाबदारीने हाताळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे करदात्यांचे काम सोपे झाले असून कर भरण्यासाठी त्यांचा वेळदेखील वाचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच, लोकांना त्यांच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती मिळत आहे. परिणामी यासंबंधी वाददेखील कमी होत आहेत.

गेल्या 14 महिन्यांत सुमारे एक लाख करदात्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतेक लोक असे आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आयकर कायद्यांतर्गत अधिकारी सहा वर्षांपेक्षा जुनी प्रकरणे पुन्हा उघडू शकतात.

निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, CBDT ने मे 2023 मध्ये 55,000 नोटिसांचे छाननी मूल्यांकन पूर्ण केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञानामुळे जास्त पारदर्शकता आल्यामुळे लोक आता व्यवस्थेला फसवू शकत नसल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केले आहे. त्यामुळे कर भरण्यापासून वाचण्यासाठी कोणी पळवाट शोधत असेल कर त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते म्हणून आपले कोणतेही उत्पन्न किंवा आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत लपवण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT