YouTube|India Dainik Gomantak
अर्थविश्व

कंटेंट क्रिएटर्सना दणका! YouTube ने हटवले भारतातील 19 लाख व्हिडिओ

YouTube ने यावेळी 85 लाखांपेक्षा जास्त कमेंट्सही काढून टाकल्या आहेत. त्यापैकी बहुतेक स्पॅम होत्या. यामध्ये असंख्य कमेंट्स आक्षेपार्हसुद्धा होत्या.

Ashutosh Masgaunde

YouTube deleted 64 lakh videos, including more than 19 lakh videos from India:

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने यावर्षी जानेवारी-मार्च दरम्यान कम्युनिटी गाइडलाइन्से उल्लंघन केल्याबद्दल भारतातील 19 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत.

अशा प्रकारची कारवाई यूट्यूबने जगभरातील अनेक देशांमध्ये केली आहे. यामध्ये भारतातील व्हिडिओ हटवल्याचा आकडा सर्वाधिक आहे.

YouTube ने कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याबद्दल जागतिक स्तरावर प्लॅटफॉर्मवरून 64 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. त्यापैकी 19 लाखांहून अधिक व्हिडिओ फक्त भारतातील होते.

YouTube च्या कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने ही कारवाई केली.

YouTube ने भारतातील तक्रारींवर कारवाई करत जानेवारी-मार्च दरम्यान 19 लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत. त्या तुलनेत अमेरिकेत 6.54 लाख व्हिडिओ, रशियामध्ये 4.91 लाख व्हिडिओ आणि ब्राझीलमध्ये 4.49 लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत.

YouTube ने म्हटले आहे की, कंपनी म्हणून सुरुवातीपासून, आमच्या कम्युनिटी गाइडलाइन्सनी YouTube यूजर्सना हानिकारक कन्टेन्टपासून दूर ठेवले आहे.

YouTube ने यावेळी 85 लाखांपेक्षा जास्त कमेंट्सही काढून टाकल्या आहेत. त्यापैकी बहुतेक स्पॅम होत्या. यामध्ये असंख्य कमेंट्स आक्षेपार्हसुद्धा होत्या.

YouTube ने बुधवारी सांगितले, “गेल्या काही वर्षांत, आम्ही YouTube यूजर्सचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आज, बहुतेक निर्माते विश्वासाने कन्टेन्ट अपलोड करतात. आमचा विश्वास आहे की आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या निर्मात्यांची संख्या कमी करण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.”

कंपनीच्या म्हणण्यानुसार, YouTube ने काढलेले 93 टक्क्यांहून अधिक व्हिडिओ पूर्वी मानवांऐवजी मशीनद्वारे प्रोड्यूस केले गेले होते.

मशीनद्वारे प्रोड्यूस केलेल्या व्हिडिओंपैकी, 38 टक्के व्हिडिओ कोणत्याही यूजरने पाहण्याआधी काढून टाकण्यात आले आहेत. यातील 31 टक्के व्हिडिओ काढण्यापूर्वी एक ते 10 वेळा पाहिले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT