Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई

Tilak Mehata: वयाच्या 13 व्या वर्षी मुले अभ्यास आणि खेळात व्यस्त असतात, पण या वयात तिलक मेहता याने 100 कोटींची कंपनी उभी केली. आज त्याच्यामुळे 200 लोकांना रोजगार मिळाला आहे.
Tilak Mehta Set Up a Paper N Parcel Company With a Turnover of Rs 100 Crore.
Tilak Mehta Set Up a Paper N Parcel Company With a Turnover of Rs 100 Crore.Dainik Gomantak

Tilak Mehta Set Up a Paper N Parcel Company With a Turnover of Rs 100 Crore:

यश हे कोणत्याही वयावर अवलंबून नसते. तुमची जिद्द असेल आणि कठोर परिश्रम घेतले तर तुम्हाला यश नक्कीच मिळते. हे अवघ्या 17 वर्षीय तिलक मेहताने सिद्ध केले आहे.

ज्या वयात लोक शालेय अभ्यास, खेळ आणि मौजमजा यात मग्न असतात, त्या वयात तिलकने १०० कोटी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी स्थापन केली.

तिलकने अभ्यासाबरोबरच व्यवसाय सुरू ठेवला आणि दोन वर्षांत तो यशस्वी उद्योजक बनला. इतक्या लहाण वयात तिलक 200 हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत.

कोण आहे तिलक मेहता

वयाच्या 13 व्या वर्षी तिलक मेहताने पेपर-एन-पार्सल ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. आज तिलक 17 वर्षांचा आहे. तिलकचा जन्म 2006 साली झाला. गुजरातमध्ये जन्मलेला तिलक आज एका कंपनीचा संस्थापक आहे.

तिलकचे वडील विशाल मेहता एका लॉजिस्टिक कंपनीत काम करतात. तिलक यांच्या आई काजल मेहता गृहिणी आहेत. त्याला एक बहीणही आहे.

तिलक 13 वर्षांचा असताना एका घटनेने त्यांला व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. वडिलांच्या थकव्यातून टिळक मेहता यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना सुचली.

ऑफिसमधून परतल्यावर तो वडिलांना बाजारातून स्टेशनरीच्या वस्तू आणायला सांगायचा, तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचे. वडिलांची दमछाक पाहून कधी कधी शाळेसाठी स्टेशनरीची गरज आहे हेही सांगता येत नव्हते.

अशी सुचली व्यवसायाची कल्पना

एकदा तिलक आपल्या मामाच्या घरी सुट्टीसाठी गेला होता. घरी परतत असताना तो त्याचे एक पुस्तक मामाच्या घरी विसरला. परीक्षा सुरू होणार होती, त्याला ते पुस्तक हवे होते, पण जेव्हा कुरिअर एजन्सीत चौकशी केली तेव्हा कळले की कुरिअरचे शुल्क पुस्तकापेक्षा जास्त आहे. पैसे खर्च करूनही त्याला पुस्तकाची डिलिव्हरी एका दिवसात मिळू शकली नाही. या घटनेनंतर त्याला व्यवसायाची कल्पना सुचली.

वडिलांची साथ

तिलकला व्यवसायाची कल्पना सुचल्यानंतर त्याने आपल्या वडिलांसोबत व्यवसायाची योजना शेअर केली. कुरियर सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी संपूर्ण योजना तयार केली.

वडिलांनी त्याला निधी दिला, त्याची ओळख बँक अधिकारी घनश्याम पारेख यांच्याशी करून दिली, ज्यांनी तिलकच्या व्यवसायात गुंतवणूक केली. तिलकची कल्पना ऐकून ते बँकेची नोकरी सोडून व्यवसायात आले. दोघांनी मिळून पेपर एन पार्सल नावाची कुरिअर सेवा सुरू केली. तिलकने आपल्या कंपनीचे नाव 'पेपर अँड पेन्सिल' ठेवले आणि घनश्याम पारेख यांना कंपनीचे सीईओ बनवले.

Tilak Mehta Set Up a Paper N Parcel Company With a Turnover of Rs 100 Crore.
Aishwarya Sheoran: रॅम्प ते रॅंक! मॉडेलिंग करिअर सोडले अन् ऐश्वर्याने 10 महिन्यांतच मिळवले UPSC मध्ये यश

100 कोटींची उलाढाल आणि 200 लोकांना रोजगार

तिलकने एका दिवसात वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी मुंबईतील डब्बावाल्यांची मदत घेतली. सुरुवातीला त्याची कंपनी बुटीक आणि स्टेशनरीच्या दुकानातून छोट्या-छोट्या ऑर्डर्स घेऊन त्या पोहोचवत असे.

छोटी स्थानिक दुकाने, डब्बेवाले, कुरिअर एजंट असे संपूर्ण नेटवर्क त्याने तयार केले. आज त्यांची कंपनी 200 हून अधिक लोकांना रोजगार देते. दोन वर्षांत तिलकच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपये आहे. ते लवकरात लवकर 200 कोटींच्या पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे तिलक सांगतो.

या लघुउद्योजकाची क्षमता पाहून 2018 साली त्यांना इंडिया मेरिटाइम अवॉर्ड्समध्ये युवा उद्योजक ही पदवी मिळाली. त्याची कंपनी लोकांना घरोघरी सेवा देते. हे काम कंपनी मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून चालवते.

सध्या तिलकच्या कंपनीबरोबर 200 कामगार आणि 300 हून अधिक डब्बेवाले आहेत. या डब्बावाल्यांच्या मदतीने कंपनी दररोज 1200 हून अधिक पार्सल पोहोचवते. प्रत्येक पार्सल पोहोचवण्यासाठी 40 ते 180 रुपये आकारले जातात.

Tilak Mehta Set Up a Paper N Parcel Company With a Turnover of Rs 100 Crore.
Goa Investment News: नवीन गुंतवणुकदारांची गोव्याकडे पाठ; गतवर्षीच्या तुलनेत गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य मागे

शाळेत जायच्या वयात मासिक 2 कोटी पगार

2021 मध्ये तिलक मेहता याच्या कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शाळेत जायच्या वयात तिलक मेहता दरमहा 2 कोटी रुपये पगार घेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com