Shopping  Dainik Gomantak
अर्थविश्व

ग्राहक म्हणून आपले काय चुकते?

आपण ‘ग्राहक राजा’ आहोत याची जाणीव आपल्याला नसते.

दैनिक गोमन्तक

आपण फार भेदरुन असतो. आपण ‘ग्राहक राजा’ आहोत याची जाणीव आपल्याला नसते. जी गोष्ट आपण विकत घेतो आहोत, ती आपल्यां कष्टाच्या कमाईतून, आपल्या पैशातून (Money) आपण विकत घेतो आहोत हे जवळ- जवळ आपण विसरुन गेलेलो असतो. तक्रार करायची झाल्यास देखील आपण ती घाबरत घाबरत करतो. जणू आपलीच काहीतरी चूक झाली आहे अशी आपली भावना असते.

आपण कितीही म्हणालो तरी अजून भारताचं (India) मार्केट हे ‘कन्झ्युमर्स मार्केट’ बनलेले नाही आहे. ते अजून ‘सर्विस प्रोव्हायडर्स’चे मार्केट आहे. उत्पादनाचं ‘मार्केटिंग’ (Marketing) एखादी भूल घातल्यागत चालू असते. त्यासाठी सारे नैतिक - अनैतिक मार्ग चोखाळले जातात. जाहिरातींचा मारा तर असा अव्याहत चालू असतो की ‘चमकदार जाहीराती म्हणजेच चमकदार उत्पादन’ असा काहीसा भ्रम उपभोक्त्यांच्या मनाला घेरून असतो. त्यामुळे उत्पादनाबद्दल फारशी माहिती न घेताच अनेक उत्पादने खरेदी केली जातात. खरंतर एका प्रकारच्या फसवणुकीला आपण ‘ग्राहक’ म्हणून बळी पडलेलो असतो.

आपण एखाद्या सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये जातो. तिथे कित्येक उत्पादकावरच्या लेबलवर किंमत, उत्पादनाची तारीख लिहिलेली असते, मात्र त्यावर एक्सपायरीची तारीख मात्र लिहिलेली नसते. आपण ते उत्पादन घरी घेऊन येतो व अवघ्याच दिवसांत खराब झाले की आपणावरच चडफडत राहतो. उत्पादनाच्या लेबलवर काय काय असायला हवं? उत्पादक कंपनीचे नाव असायला हवे, त्यांचा पत्ता असायला हवा, उत्पादन कधी झाले याची तारीख असायला हवी आणि ‘एक्सपायरी’ची तारीखही असायला हवी. ग्राहकांनी (Customer) हे बारीक - बारीक तपशील लक्षात ठेवायला हवेत. आणि आत्मविश्‍वासाने ते असण्याबद्दल आग्रह धरायला हवा.

गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन सांगतात, ‘कार्यशाळेत आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना ‘डोके वर करुन बोला’ हेच शिकवतो. ‘ग्राहक’ म्हणून तुमच्यावर कोणी उपकार करत नाही. तुम्ही तुमच्या पैशानेच उत्पादन विकत घेत असता’. रोलंडच्या मते, अनेक ग्राहक दुकानदाराकडे बिल मागत नाहीत. ही त्यांची मोठी चूक असते. अनेकदा दुकानदार बिल केले तर अधिक पैसे लागतील अशी भीती घालतात. खरंतर ते अनेकदा चुकीचे असते. पण अशाचतऱ्हेने बिल न घेण्याची सवय ‘ग्राहका’ला लागते. खरंतर अनेकदा ‘जीएसटी’ अंतर्भूत करूनच आपण पैसे अदा केलेले असतात पण दुकानदार अतिरिक्त पैसे ‘जीएसटी’च्या नावाने ग्राहकांकडून उकळतात. अशावेळी ग्राहकाने जागृत राहून, अशा फसवणुकीविरुध्द पाऊल उचलायचे असते.

गोव्यात वजन - मापे खाते आहे, कायदे आहेत परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे त्यांनाही शक्य होत नाही. ‘गोवा कॅन’ने ‘डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल सप्लाय ॲण्ड कंझ्युमर्स अफेअर्स’ बरोबर या संबंधात चर्चा केली आहे. असे ठरले गेले आहे की येत्या वर्षापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एका निरीक्षकाची नेमणूक करून त्यांच्याद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातील. या तक्रारी निरीक्षक स्वतः मुख्य ठिकाणी पाठवतील. रोलंड यांना असे वाटते की ही उपाययोजना लागू केल्यास ग्राहकाच्या दृष्टीने ते अधिक उपयोगी ठरेल. पण ‘ग्राहक’ अजूनही एका गोष्टीवर विश्‍वास ठेवायला तयार नसतो- तक्रार पुस्तिकेत तक्रार नोंदवल्यानंतर त्यावर पावले उचलली जातील यावर त्याचा विश्वासच नसतो. ग्राहकाने या मनस्थितीतून बाहेर येणे प्रथम गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT