Hackers Stealing Data Without Links: आजचा काळ डिजिटलचा आहे. आपण आपल्या 24 तासांपैकी किमान 2-4 तास फोन वापरण्यात घालवतो. मग ते कॉलिंग असो, सोशल मीडियावरील पोस्ट किंवा रील पाहणे असो, किंवा व्हॉट्सॲप सारख्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सद्वारे जवळच्या मित्रांशी किंवा नातेवाईंकाशी बोलणे असो. मोबाईल आणि लॅपटॉप हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत.
अशा परस्थितीत, स्कॅमर लोकांना फसवण्याच्या नव-नवीन ट्रीक शोधत आहेत. स्कॅमर लोकांना डिजिटल अरेस्ट देखील करत आहेत. आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून अशाच एका स्कॅमबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे स्कॅमर तुम्हाला कोणत्याही लिंकवर क्लिक न करवता तुमचा डेटा चोरत आहेत. या पद्धतीचे नाव 'झिरो क्लिक हॅक' असे आहे. चला तर मग हे झिरो क्लिक हॅक काय आहे ते सविस्तररित्या जाणून घेऊया...
तुम्ही ऐकले असेलच की अनेकदा हॅकर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे आपल्या फोनवर एक लिंक पाठवतात, ज्यावर तुम्ही क्लिक करताच तुमचा फोन किंवा तुम्ही वापरत असलेले कोणतेही डिव्हाइस हॅक होते. पण, वाढत्या डिजिटलायझेशनच्या या युगात, अशी एक प्रणाली उदयास आली आहे जी कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही तुमचा डेटा चोरत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली स्पायवेअरने आतापर्यंत जगभरातील डझनभर देशांमध्ये जवळपास 90 लोकांना प्रभावित केले आहे. लोकांचा डेटा लिंक न करता हॅक करण्यात आला आहे. या पद्धतीचे नाव 'झिरो क्लिक हॅक' असे आहे.
अहवालानुसार, ही हॅकिंग पद्धत एका इस्रायली कंपनीकडून वापरली जात आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर इंटॉल केले जाते आणि नंतर हॅकर्स येऊन वापरकर्त्यांची खाजगी माहिती चोरतात. हॅकर्संनी मेसेजिंग ॲप्स, ईमेल क्लायंट किंवा मल्टीमीडिया प्रोसेसिंग फंक्शन्समधील कमजोरींचा फायदा घेतला आहे.
झिरो क्लिक हॅकिंग पद्धत: हॅकर्स अनेकदा व्हॉट्सॲपद्वारे वापरकर्त्यांच्या फोनवर फाइल्स पाठवतात, ज्या ट्रॅक करणे खूप कठीण होत चालले आहे. तथापि, हे टाळण्यासाठी, वापरकर्ते काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात.
तुम्ही तुमच्या फोनमधील अॅप्स अपडेट करत राहा. अपडेट केल्याने तुम्हाला केवळ नवीन फिचर्सच मिळत नाहीत तर जुने बगही काढून टाकले जातात.
याशिवाय, जर फोनची बॅटरी अचानक संपू लागली आणि अनोळखी नंबरवरुन मेसेज येऊ लागले तर ते हॅकिंग मेसेज असू शकतात.
जर तुम्हाला कोणतेही ॲप वापरताना पूर्वीपेक्षा जास्त बग्स दिसले किंवा ॲप वापरताना तुम्हाला काही असामान्य आढळले तर सायबर तज्ञांशी लगेच संपर्क साधा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.