आता तुम्ही SBI Card द्वारे करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या प्रोसेस

एसबीआय कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रूपे क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक UPI प्लॅटफॉर्मवर कार्डद्वारे पेमेंट करू शकणार आहे.
SBI
SBIDainik Gomantak

SBI Card: एसबीआय कार्ड धारकांसाठी एका आनंदाची बातमी आहे. एसबीआय कार्ड आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने SBI RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची घोषणा केली आहे.

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, SBI कार्डचे RuPay क्रेडिट कार्ड धारक 10 ऑगस्ट पासून UPI ​​ट्रांजेक्शन करू शकतात. तसेच तुम्ही UPI पेमेंटसाठी कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरत असलात तरी, SBI कार्ड देखील वापरता येईल.

  • UPI पेमेंटलाही चालना मिळेल

या नवीन सुविधेबद्दल माहिती देताना एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणाले की, एसबीआय कार्डच्या या स्टेपद्वारे ग्राहकांना रुपे प्लॅटफॉर्मद्वारे UPI पेमेंटची सुविधा मिळणार आहे. यासोबतच UPI पेमेंटलाही चालना मिळणार आहे. आता लोक पेमेंटसाठी क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर करू शकणार आहे. अमारा पुढे म्हणाले की, ही सुविधा डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणेल. UPI आणि SBI कार्डमधील ही पार्टनरशिप आता ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करण्यास सक्षम करेल.

SBI
Shani Dev : शनिवारी 'या' रंगाचे कपडे घालणे मानले जाते शुभ
  • या सुविधेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही

यासंदर्भात माहिती देताना, NPCI चे एमडी आणि सीइओ दिलीप आसबे यांनी सांगितले की, NPCI आणि SBI कार्डच्या या पार्टनरमुळे लोकांना RuPay क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंटसाठी नवीन पर्याय उपलब्ध होतील. हा एक फास्ट आणि सोपा पर्याय आहे. आता कोणताही SBI कार्ड धारक त्याच्या अॅक्टिव कार्डवर UPI नॉमिनेशन सहज करू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क भरावे लागणार नाही. कार्ड UPI शी लिंक करण्यासाठी, SBI क्रेडिट कार्ड नोंदणीकृत क्रमांक UPI शी लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही दोन्ही लिंक करू शकत नाही.

  • लिंक करण्यासाठी काय करावे

सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही UPI अॅप डाउनलोड करावे.

यानंतर तुमच्या मोबाइल नंबरद्वारे UPI अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करावे.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, अॅड क्रेडिट कार्ड जोडा किंवा लिंक क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा.

क्रेडिट कार्डचा पर्याय निवडावा .

यानंतर SBI Rupay Credit Card पर्याय निवडावा.

शेवटी तुमचा कार्डवरचा 6 अंकी क्रमांक टाकावा आणि एक्सपायरी डेट देखील टाकावी.

तुमचे UPI अॅप SBI कार्डशी लिंक केले जाईल.

  • पेमेंट कसे करावे

जर तुम्हाला SBI कार्डद्वारे UPI अॅपमधून पेमेंट करायचे असतील तर त्यासाठी आधी QR कोड स्कॅन करावा.

किती रक्कम द्यायची आहे तेवढी टाकावी.

पेमेंट पर्यायातून SBI RuPay Credit Card पर्याय निवडा.

नंतर तुमचा 6 अंकी UPI Pin टाकावा.

अशा पद्धतीने पेमेंट करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com