Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

Wild Boar Attack In Goa: जंगलात काजू बागायतीत साफसफाईसाठी गेला असता रान‌डुकराने केलेल्या हल्ल्यात राम गोविंद गावकर (५९) या इसमाला आपला प्राण गमवावा लागला.
Wild Boar Attack
Wild Boar AttackDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जंगलात काजू बागायतीत साफसफाईसाठी गेला असता रान‌डुकराने केलेल्या हल्ल्यात राम गोविंद गावकर (५९) या इसमाला आपला प्राण गमवावा लागला. बेदुर्डे येथे काल रविवारी ही दुर्दैवी घटना घडली.

पोलिसांनी राम यांचा भाऊ रमेश व मुलगा सत्येंद्र यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, काजू बागायतीत सफाईसाठी जंगलात गेला असता राम यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन तेथेच निपचित पडले.

Wild Boar Attack
Goa Nightclub Fire: 'हे तर प्रशासनाचे अपयश'! हडफडे दुर्घटनेबाबत राहुल गांधींकडून संवेदना; वाचा महत्वाच्या प्रतिक्रिया..

रात्री पावणेदहाच्या सुमारास राम याला कुटुंबीयांनी बाळ्ळी येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Wild Boar Attack
Goa Egg Price: कसा करायचा ख्रिसमस साजरा? महागाईचा भडका; अंडी - नारळाचे वाढले भाव; जाणून घ्या ताजा दर..

या मृत्युप्रकरणी पोलिसांनी घातपाताचा संशय नाकारला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com