Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

Luthra Brothers Fled: भीषण आगीच्या घटनेनंतर क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी देशातून पळ काढल्याचे समोर आले.
 Saurabh Luthra
Saurabh LuthraDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील बहुचर्चित 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमधील भीषण आगीच्या घटनेनंतर क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी देशातून पळ काढल्याचे समोर आले. घटनेच्या अवघ्या काही तासांतच त्यांनी भारताबाहेर पळ काढला. या दोन्ही आरोपींविरुद्ध गोवा पोलिसांनी 'लुक आऊट सर्कुलर' जारी केले असून त्यांना पकडण्यासाठी आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे.

मालकांनी देशाबाहेर पळ काढला

आगीच्या दुर्घटनेनंतर तात्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्वरित कारवाईला सुरुवात केली. गोवा पोलिसांनी तातडीने एक पथक आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांच्या दिल्लीतील पत्त्यांवर धाड टाकण्यासाठी रवाना केले. मात्र, दोन्ही आरोपी त्यांच्या घरी उपलब्ध नव्हते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांच्या घरांवर योग्य कलमांतर्गत नोटीस लावण्यात आली.

यादरम्यान, 7 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत गोवा पोलिसांच्या विनंतीवरुन ब्युरो ऑफ इमिग्रेशन (BOI) कडून दोघांविरुद्ध 'लुक आऊट सर्कुलर' जारी करण्यात आले.

 Saurabh Luthra
Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

गोवा पोलिसांनी मुंबईतील ब्युरो ऑफ इमिग्रेशनशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती उघड झाली. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर तातडीने पहाटे 5.30 वाजता गौरव आणि सौरभ लुथरा यांनी इंडिगो (6E 1073) विमानाने थायलंडला गेल्याचे समोर आले. घटनेच्या काही तासांतच त्यांनी देश सोडणे हा त्यांचा पोलीस तपासापासून दूर राहण्याचा स्पष्ट हेतू दर्शवतो, असे गोवा पोलिसांनी म्हटले.

आरोपींना देशात आणण्यासाठी इंटरपोलची मदत

आरोपींनी देशाबाहेर पळ काढल्यामुळे गोवा पोलिसांनी (Goa Police) आता त्यांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊले उचलली आहेत. आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा यांना लवकरत लवकर पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी सी.बी.आय.च्या इंटरपोल विभागाशी (Interpol Division of CBI) समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. इंटरपोलच्या माध्यमातून त्यांच्या अटकेची आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया जलदगतीने सुरु केली जाणार आहे.

 Saurabh Luthra
Goa Nightclub Fire: धुरात गुदमरून मृत्यू जवळ आला होता, पण... 'तो' माणूस देवासारखा धावून आला! हडफडे क्लबमधील कझाक डान्सरने सांगितली आपबिती

व्यवस्थापक भरत कोहली अटकेत

याप्रकरणातील अन्य आरोपींवरही पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दिल्लीतून भरत कोहली या आरोपीला अटक केली आणि त्याला गोव्यात आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांडही मिळवली. भरत कोहली या क्लबचे दैनंदिन कामकाज पाहत होता आणि तो या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी आहे. कोहलीच्या चौकशीतून क्लबमधील सुरक्षा त्रुटी आणि मालकांच्या भूमिकेबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

 Saurabh Luthra
Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

दरम्यान, आगीच्या (Fire) घटनेत मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास पूर्ण ताकदीने करत असून फरार मालकांना देशात परत आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com