Diwali 2023 Muhurat Trading : दिवाळीसारख्या शुभ मुहूर्तावर देशभर घरात पूजा केली जाते. देशभरातील अनेक भागात दिवाळी हे भारताचे नवीन वर्ष म्हणूनही साजरे केले जाते. याशिवाय दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनही केले जाते.
लोक त्यांचे घर, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी हिंदू देवी लक्ष्मीची पूजा करतात. घर, ऑफिस, दुकान याठिकाणी सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी ही पूजा केली जाते. भारताच्या शेअर बाजारातही ही संस्कृती पाळली जाते.
दिवाळीला भारतातील शेअर बाजार बंद असतो, परंतु शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर, बाजार निश्चित वेळेसाठी उघडला जातो. या निश्चित वेळेलाच मुहूर्त ट्रेडिंग असे नाव देण्यात आले आहे.
SEBI शेअर बाजारावर नियंत्रण ठेवते. भारतीय शेअर बाजार कोणत्या दिवशी उघडेल आणि कोणत्या दिवशी बंद राहणार हे सेबी ठरवत असते. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनासह दिवाळीतही बाजार बंद असतो. मात्र, दिवाळी एका शुभ मुहूर्तावर येते.
याशिवाय या दिवशी लक्ष्मीपूजन होत असल्याने भारतातील गुंतवणूकदारांना या दिवशी शेअर बाजारात व्यवहार करण्याची इच्छा असते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे.
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान तुम्ही गुंतवणूक करताना, तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तुम्ही जो व्यवहार करणार आहात त्याचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे याचा विचार करा.
तसेच तुम्ही बाजारात नवीन शेअर्स खरेदी करत असाल तर किती दिवसांसाठी करणार याचा विचार करा. तुमची गुंतवणूक दीर्घ, मध्य किंवा अल्प मुदतीसाठी आहे या काळजीपूर्वक विचार करा.
तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर्स खरेदी करणार असाल, तर मजबूत कंपन्यांचा शोध घ्या.
तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करा, म्हणजेच तुमचे सर्व भांडवल एका शेअर किंवा एकाच मालमत्ता वर्गात गुंतवू नका. सोप्या भाषेत, जर तुमच्याकडे 50,000 रुपये भांडवल असेल तर ते फक्त IT संबंधित शेअर्समध्ये गुंतवू नका.
ते 50,000 रुपये भांडवल विविध क्षेत्रातील समभागांमध्ये किंवा इतर मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवा. याचा अर्थ असा होईल की बाजारातील मंदीच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओचे कमी नुकसान होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.