Diwali Muhurat Trading Dainik Gomantak
अर्थविश्व

Muhurat Trading: सोमवारी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या 'या' विशेष ट्रेडिंगबद्दल

शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दिवाळीचा सण शेअर बाजाराच्या (Share Market) दृष्टिकोणातून खूप महत्त्वाचा आहे. दिवाळीच्या दिवसात गुंतवणूक करणे शुभ मानले असते. घर आणि व्यवसायातही समृद्धी वाढते अशी आपल्याकडे मान्यता आहे. या दिवसात शेअर बाजार बंद असला तरी सायंकाळी एक तासासाठी शेअर बाजार खरेदी-विक्रीसाठी खुला असतो. यालाच मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat Trading) असे म्हणतात.

अनेक दिवसांपासून ही परंपरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी 24 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे. यात तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी आहे. मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान, एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून परंपरेचे पालन करतात. इक्विटी, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स, चलन आणि कमोडिटी मार्केट या तिन्हींमध्ये हे ट्रेडिंग होते. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी येत आहे.

या दिवशी बाजारात 6.15 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. संध्याकाळी 06 ते 6.10 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल.

दिवाळीच्या दिवशी घराघरात लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही हिंदू धर्मातील संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. या दिवशी आर्थिक व्यवहार करणे शुभ मानले जाते. या कारणास्तव, भारतीय शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगला महत्व आहे. मुहूर्त ट्रेडिंग बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 1957 मध्ये सुरू झाले, त्यानंतर देशातील जवळपास सर्वच एक्सचेंजेसने ही परंपरा स्वीकारली. नंतर एनएसई आल्यानंतर 1992 नंतरही मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा चालू राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT