Ola S1 Air Launch: ओला इलेक्ट्रिकने दिवाळीनिमित्त त्यांच्या S1 या इलेक्ट्रिक स्कूटरचे अपडेटेड मॉडेल S1 एयर सादर केले आहे. ही ओलोची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असून 999 रूपयांत तिचे बुकिंग करता येणार आहे.
या नव्या मॉडेलची किंमत 84 हजार 999 रुपए आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत बुकिंग करणाऱ्यांना त्यासाठी 79 हजार 999 रुपए मोजावे लागतील. ही स्कूटर 999 रूपयांमध्ये बुक करता येणार आहे. या स्कुटरचे वितरण पुढील वर्षात एप्रिल महिन्यापासून केले जाणार आहे.
ओला चे CEO भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, फास्ट चार्जरद्वारे ही स्कूटर केवळ 15 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्ज होते. सध्या ओलाच्या स्कूटर्स ऑपरेटिंग सिस्टिम 2 वर कार्यरत आहेत. पण या अद्ययावात स्कूटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम 3 आहे. S1 एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 101 किलोमीटर धावू शकते.
या स्कुटरचे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास इतके आहे. 0 ते 40 किलोमीटरचे स्पीड ही गाडी 4.3 सेकंदात गाठते. ड्रायव्हर बाईकच्या जवळ गेल्यावर गाडीचे लॉक आपोआप उघडले जाईल. या गाडीतील म्युझिक सिस्टिमदेखील अपग्रेड केली गेली आहे. S1 पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सध्या कंपनीचे S1 आणि S1 प्रो अशी दोनी मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. S1ची किंमत 99 हजार 999 रुपए आणि S1 प्रो ची किंमत 1.40 लाख रुपए (एक्स शोरूम) आहे. सध्या S1 हीच ओलाची सर्वादिक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
2024 मध्ये ओला लाँच करणार कार
ओला इलेक्ट्रिकने पुढील वर्षीपर्यंत इलेक्ट्रिक कार आणण्याची घोषणा केली आहे. CEO भाविश अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक कारची पहिली झलक दाखवली होती. ही कार एकदा फुल चार्ज केली की 500 किलोमीटर धावेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.