आर्थिक संकटात अडकलेल्या दूरसंचार सेवा (Telecom Service) पुरवणाऱ्या व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्संनी (Shares) आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना फक्त 11 दिवसांत 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.बीएसईवर (BSE) आजच्या व्यवहारात वोडाफोन आयडियाचे शेअर्स (Share Market) 10 टक्क्यांनी वाढून 12.37 रुपये झाले आहेत . आज हा शेअर 39 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने दूरसंचार क्षेत्रासाठी मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स अधिकच वाढत आहेत.(Vodafone Idea shares on high, 100 percent return to investors)
बुधवारी मंत्रिमंडळाने तणावग्रस्त दूरसंचार क्षेत्रासाठी एक मोठे सुधारणा पॅकेज मंजूर केले होते. पॅकेजमध्ये वैधानिक देयके भरण्यापासून चार वर्षांची स्थगिती, स्पेक्ट्रम शेअर करण्याची परवानगी, समायोजित सकल महसूल (AGR) च्या व्याख्येत बदल आणि 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. सरकारच्या निर्णयाचे कौतुक करताना, संकटात सापडलेल्या वोडाफोन आयडियाचे प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला यांनी हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले आणि ते या क्षेत्राला महत्त्वपूर्ण गती देणार असल्याचे सांगितले. बिर्लाचा वोडाफोन आयडियामध्ये 27 टक्के हिस्सा आहे.
Vodafone Ideaचे शेअर्स 11 दिवसात 100% पेक्षा जास्त वाढले
गेल्या 11 दिवसांत वोडाफोन आयडियाचा हिस्सा 100 टक्क्यांनी वाढला आहे. व्होडाफोन आयडियाचा वाटा दुप्पट म्हणजेच 103 टक्क्यांहून अधिक झाला आहे. 1 सप्टेंबर 2021 रोजी वोडाफोन आयडियाचा शेअर 6.09 रुपयांच्या किंमतीवर होता. 17 सप्टेंबर 2021 रोजी त्याची किंमत 12.37 रुपये झाली. जानेवारी 2021 मध्ये हा स्टॉक 13 . 80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता.
Vodafone Idea च्या शेअर्सने केवळ 11 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत . ज्या गुंतवणूकदारांनी 1 सप्टेंबरला व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, त्यांचे पैसे आता 2 लाख रुपयांपर्यंत वाढले असते.
कंपनीवर आहे 1.80 लाख रुपयांचे कर्ज
अधिकृत आकडेवारीनुसार, वोडाफोन आयडियावर AGR दायित्व 58,254 कोटी रुपये आहे. यापैकी कंपनीने 7,854.37 कोटी रुपये भरले आहेत, तर कंपनीकडे 50,399.63 कोटी रुपये थकीत आहेत. कंपनीचे सध्या एकूण कर्ज 1,80,310 कोटी रुपये इतके आहे. यात भाडेपट्टीशी संबंधित देयकांचा समावेश नाही. कंपनीच्या कर्जामध्ये स्थगित स्पेक्ट्रम पेमेंटमध्ये 96,270 कोटी रुपये आणि बँका आणि वित्तीय संस्थांसाठी 23,080 कोटी रुपये समाविष्ट आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.