UPI In Srilanka Dainik Gomantak
अर्थविश्व

लंकेतही डंका! श्रीलंकेत लवकरच सुरू होणार UPI, गेल्या वर्षी झाला होता दोन्ही देशांमध्ये करार

UPI Payment: भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (CBSL) चे गव्हर्नर डॉ. नंदलाल वीरासिंघे यांच्यात झालेल्या बैठकीत त्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली.

Ashutosh Masgaunde

UPI will soon be launched in Sri Lanka, the agreement was signed between the two countries last year:

भारताने श्रीलंकेसोबत UPI पेमेंट प्रणाली लवकर सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे. भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (CBSL) चे गव्हर्नर डॉ. नंदलाल वीरासिंघे यांच्यात झालेल्या बैठकीत त्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली.

बैठकीनंतर संतोष झा म्हणाले, बैठकीत श्रीलंकेच्या आर्थिक पुनरुत्थानात भारत एक स्थिर भागीदार राहील याचा पुनरुच्चार करण्यात आला. श्रीलंकेत UPI पेमेंट प्रणाली लवकर सुरू करणे, भारतीय रुपयाद्वारे व्यापारात वाढ आणि श्रीलंकेच्या कर्ज पुनर्गठन प्रक्रियेवर सकारात्मक चर्चा झाली.

जुलै 2023 मध्ये त्यांच्या दोन दिवसांच्या भारत भेटीदरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या स्वीकृतीसाठी करारावर स्वाक्षरी केली होती.

या अंतर्गत, दोन्ही देशांनी UPI आणि Lanka Pay ला जोडून फिनटेक सेक्टर कनेक्टिव्हिटीवर काम करण्याचे ठरवले होते.

रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये भारत श्रीलंकेला मदत करणार

भारत-श्रीलंका यांनी संयुक्तपणे $91.27 दशलक्ष खर्चून संपूर्ण श्रीलंकेत रेल्वे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. यामुळे वस्तू आणि सेवांची गतिशीलता वाढेल आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल.

भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, श्रीलंकेचे परिवहन आणि महामार्ग मंत्री डॉ. बंदुला गुणवर्देना आणि श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी अनेक कामांचा शुभारंभ केला आहे. परिवहन मंत्री गुणवर्द्धना यांनी श्रीलंकेला विशेषतः वाहतूक क्षेत्रात दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारताचे आभार मानले.

UPI म्हणजे काय?

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची मोबाइल-आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे. मोबाइल प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो.

ही एक संकल्पना आहे जी एका मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे अनेक बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. UPI हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT