जेव्हा तुम्ही नवीन स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड टाकता तेव्हा तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी पुन्हा UPI सेटअप करावा लागतो. असे केल्याने तुमचे अनेक UPI आयडी तयार होतात. यामुळे हॅकर्सला बळी पडू शकता. तुम्ही एकापेक्षा जास्त UPI पिन वापरत असाल तर तुम्ही ते डिलीट करावेत. हे करम्यासाठी पुढील टिप्स फॉलो करू शकता.
UPI आयडी कसे अनलिंक करावे
तुम्हाला बँक खात्यातून अनलिंक करायचा आहे त्याचा UPI आयडी लॉग इन करावा.
यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जावे. यानंतर UPI सेटिंग्ज टॅबवर जा.
यानंतर तुम्हाला ज्या बँक खात्यातून UPI अॅप अनलिंक करायचे आहे ते निवडावे.
त्यानंतर तुम्हाला डीएक्टिवेट पर्याय निवडावा लागेल किंवा तुम्हाला बँक खाते काढून टाकण्याचा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
या सर्व प्रक्रियेप्रमाणे, बँक खाते UPI ID वरून अनलिंक केले जाईल.
बंद होणार इनअॅक्टिव्ह UPI आयडी
एकापेक्षा जास्त UPI आयडी असल्यास हॅकिंगचा धोका वाढतो. जे बँक फसवणुकीचे कारण बनतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने निष्क्रिय UPI आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश देणारे परिपत्रक देखील जारी केले आहे. यानंतर सर्व UPI प्लॅटफॉर्मचा निष्क्रिय UPI ID 31 डिसेंबरनंतर बंद होईल, जो मागील एक किंवा अधिक काळ वापरला गेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.