Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar Card: मोफत राशन घेणार्‍यांसाठी मोठी अपडेट, तुम्हीही म्हणाल...

Free Ration Scheme: आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Free Ration Scheme: केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात मोफत राशन आणि स्वस्त राशन दिले जाते, मात्र आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत राशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील आधार जारी करणारी संस्था UIDAI ने सांगितले की, आता तुम्ही देशभरात आधारद्वारे राशन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. UIDAI ने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

UIDAI ने ट्विट केले आहे

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले की, 'आता तुम्ही आधारद्वारे संपूर्ण देशात कुठेही राशन घेऊ शकता, परंतु यासाठी तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. वन नेशन वन आधार प्रोग्रामद्वारे तुम्ही आधार कार्डवरुन देशभरात राशन घेऊ शकता.'

जवळच्या आधार केंद्रावर संपर्क साधा

तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइट https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ द्वारे देखील आधार केंद्र शोधता येईल.

तुम्ही टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता

आजच्या काळात तुम्ही तुमच्या घरातील कामापासून ते बँकेपर्यंतची (Bank) सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर देखील संपर्क साधू शकता. इथे तुम्हाला आधारशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

Bhausaheb Bandodkar: ..भाऊसाहेबांना फक्त 10 वर्षेच मिळाली, पण त्यांनी गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली; पुण्यतिथी विशेष

Goa Politics: खरी कुजबुज; म्हावळिंगेत जागेचे गौडबंगाल

Van Maulinge: '..आमचा गाव आम्हाला हवा’! वन-म्‍हावळिंगेत लोकांचा रुद्रावतार; घरांचे सर्वेक्षण रोखले, अधिकाऱ्यांना पाठवले माघारी

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT