Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धाबाबत 'भ्रामक' पोस्ट करण पडलं महागात, युएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जण जेरबंद; सुटकेची आशा धूसर

Middle East War Social Media Misleading Posts: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा तणाव आता केवळ रणांगणापुरता मर्यादित न राहता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पोहोचला.
Middle East War Social Media Misleading Posts
UAE Indians ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

UAE Indians Arrest: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा तणाव आता केवळ रणांगणापुरता मर्यादित न राहता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पोहोचला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर करुन युद्धाबाबत भ्रामक माहिती आणि प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल प्रशासनाने मोठी कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत युएई पोलिसांनी विविध देशांच्या 35 नागरिकांना अटक केली, ज्यामध्ये 19 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली.

युएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमाद सैफ अल शम्स यांनी या कारवाईची अधिकृत पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, देशातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्ट खपवून घेतल्या जाणार नाहीत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध दोन टप्प्यांत कारवाई करण्यात आली. रविवारी वेगवेगळ्या देशांतील 25 लोकांची यादी तयार करण्यात आली, ज्यात 17 भारतीय होते. तर शनिवारी 10 जणांना अटक करण्यात आली होती, ज्यात 2 भारतीयांचा समावेश होता. अशा प्रकारे एकूण 19 भारतीय नागरिक सध्या युएई (UAE) पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Middle East War Social Media Misleading Posts
Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

प्रशासनाने या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. पहिल्या श्रेणीमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांनी युद्धातील मूळ व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्या. दुसऱ्या श्रेणीत एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करुन बनावट व्हिडिओ बनवून ते खरे असल्याचे भासवून प्रसारित करणाऱ्यांना ठेवण्यात आले. तर तिसऱ्या श्रेणीमध्ये लष्करी आक्रमकता दाखवणाऱ्या आणि युद्धाचे समर्थन किंवा प्रचार करणारे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी अटक केलेल्या 10 आरोपींमध्ये भारतासह पाकिस्तान, नेपाळ, फिलिपिन्स आणि इजिप्तच्या नागरिकांचा समावेश आहे, ज्यांनी क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ पोस्ट केले होते.

Middle East War Social Media Misleading Posts
Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

युएईमध्ये सायबर सुरक्षेचे कायदे अत्यंत कडक आहेत. या 19 भारतीयांसह इतर आरोपींना आता गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. युएईच्या कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी एक वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तसेच, आरोपींना 1 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंतचा मोठा दंडही भरावा लागू शकतो. मध्यपूर्वेतील सध्याची अस्थिर परिस्थिती पाहता, इराणने अमेरिकेवर युएईच्या बंदरांचा आणि गुप्त ठिकाणांचा वापर करुन हल्ले केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे हा परिसर आधीच तणावाखाली आहे.

Middle East War Social Media Misleading Posts
Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

या कारवाईमुळे आखाती देशांमध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त राहणाऱ्या भारतीयांसाठी एक मोठा इशारा मिळाला आहे. सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे आणि स्थानिक कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भ्रामक माहिती पसरवणे हे केवळ गुन्हेगारी कृत्य नसून त्यामुळे परदेशात असलेल्या भारतीयांच्या भविष्यावरही टांगती तलवार निर्माण होऊ शकते, हे या घटनेवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com