Toyota Camry Sprint Dainik Gomantak
अर्थविश्व

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Toyota Camry Sprint Edition Launch: प्रीमियम क्रूझर सेडान सेगमेंटमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात कॅमरी स्प्रिंट एडिशन लॉन्च केली.

Manish Jadhav

Toyota Camry Sprint Edition Launch: प्रीमियम क्रूझर सेडान सेगमेंटमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने भारतीय बाजारात कॅमरी स्प्रिंट एडिशन (Camry Sprint Edition) लॉन्च केली आहे. ही नवीन स्पेशल एडिशन गाडी तिच्या स्पोर्टी लूक आणि ॲडव्हान्स फीचर्समुळे नियमित एलिगन्स व्हेरिएंटपेक्षा अधिक आकर्षक दिसते. या नव्या गाडीची एक्स-शोरम किंमत 48.50 लाख एवढी आहे.

आकर्षक एक्सटीरियर आणि स्पोर्टी डिझाइन

दरम्यान, कॅमरी स्प्रिंट एडिशनला अधिक स्पोर्टी बनवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये स्पोर्टी फ्रंट आणि रिअर बंपर एक्सटेन्शन, ब्लॅक कलरचे 18-इंच अलॉय व्हील आणि बूट लाईटवर एक छोटा स्पॉयलर देण्यात आला आहे. ही स्पेशल एडिशन एकूण पाच कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात प्लॅटिनम व्हाइट पर्ल, डार्क ब्लू मेटॅलिक, इमोशनल रेड, सीमेंट ग्रे आणि प्रीवियस मेटल या कलरचा समावेश आहे. या सर्व कलरसोबत बोनट, रुफ आणि ट्रंकवर मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे, ज्यामुळे कारला (Car) एक ड्युअल-टोन (dual-tone) आणि आकर्षक लूक मिळतो.

लक्झरी फीचर्स

कॅमरी स्प्रिंट एडिशन केवळ लूकच्या बाबतीतच नाही, तर फीचर्सच्या बाबतीतही खूप अ‍ॅडव्हान्स आहे. यात 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि वायरलेस ॲपल कारप्ले आणि वायर्ड अँड्रॉइड ऑटो यांसारखे फीचर्स मिळतात. त्याशिवाय, यात वायरलेस चार्जर, 9-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, 10-इंच हेड-अप डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, थ्री-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, सणरुफ आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी, यामध्ये टोयोटाचा सेफ्टी सेन्स 3.0 सूट (Toyota Safety Sense 3.0 suite) आणि पार्किंग सेन्सर्सही दिले आहेत.

हायब्रिड इंजिन आणि दमदार मायलेज

नवीन कॅमरी स्प्रिंट एडिशनमध्ये जुनेच 2.5-लीटर पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेन eCVT इंजिन वापरले आहे. हे इंजिन 227 बीएचपीची पॉवर आणि 220 एनएमचा टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ होतो. या हायब्रिड सेडानमध्ये रायडिंगच्या गरजेनुसार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत. टोयोटा कंपनीचा दावा की, कॅमरी हायब्रिड 25.49 किमी प्रति लीटर उत्कृष्ट मायलेज देते, जी या सेगमेंटमधील इतर गाड्यांच्या तुलनेत खूपच चांगली आहे.

भारतीय बाजारात (Indian Market) टोयोटा कॅमरीचा थेट मुकाबला ऑडी ए4, मर्सिडीज-बेंझ सी-क्लास, लेक्सस ईएस 300एच आणि बीएमडब्ल्यू 3 सिरीज यांसारख्या प्रीमियम सेडानसोबत आहे. लवकरच बाजारात परत येण्याची शक्यता असलेल्या स्कोडा सुपर्बसोबतही या शानदार कारची स्पर्धा अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT