Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

Vasco Traffic: दाबोळी-बोगमाळो चौकात बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे तेथील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. वाहने बिनदिक्कतपणे रस्त्याच्याकडेला उभी करीत असल्याने ती इतर वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी-बोगमाळो चौकात बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे तेथील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. काही वाहनचालक आपली वाहने बिनदिक्कतपणे रस्त्याच्याकडेला उभी करीत असल्याने ती इतर वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

या समस्येकडे वाहतूक पोलिस तसेच वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.दाबोळी बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरु आहे.

Vasco
Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

त्यामुळे रुंद असलेले रस्ते अरुंद झाले आहे. त्या रस्त्यांवर खाचखळगे पडले आहेत, ते बुजविण्यात यावेत, रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सतत होत आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती.

Vasco
Vasco: रस्त्यावरच मांडला बाजार, परप्रांतीय विक्रेत्यांचा गोंधळ; वास्कोत होतेय वाहतूक कोंडी; स्थानिक संतप्त

त्यांनी सर्व्हिस रस्ता तसेच इतर सुविधा ३० सष्टेंबरपर्यंत देण्यात याव्यात, असे संबंधित कंत्राटदाराला सांगितले होते. मात्र पावसाच्या नावाखाली कंत्रांटदाराने पुढे काहीच केले नाही. उड्डाण पुलाचे बांधकाम करताना रस्त्याचे खोदकाम सुरुच आहे. त्यामुळे दिवसांगणिक वाहतूक व्यवस्थेत बदल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com