Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

Abrar Ahmed Controversial Statement: पाक खेळाडू सुधरेना भारताच्या त्या खेळाडूला मला थोबडावायचंय...; जा जा जा करणाऱ्या अबरारचं वादग्रस्त विधान
Abrar Ahmed Controversy
Abrar Ahmed ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

अलिकडेच संपन्न झालेल्या २०२५ च्या आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा तीन वेळा पराभव करून वर्चस्व सिद्ध केले. संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाने पाकिस्तानला अक्षरशः नामोहरम केले. मात्र, या पराभवानंतरही पाकिस्तानी खेळाडूंचा अहंकार आणि वादग्रस्त वक्तव्ये कायम सुरूच आहेत. याच दरम्यान, पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदच्या एका विधानामुळे नवा वाद पेटला आहे.

एका अलीकडील मुलाखतीदरम्यान अबरार अहमदला विचारण्यात आले की, “तू जगातल्या कोणत्या क्रिकेटपटूसोबत बॉक्सिंग करायला आवडेल? कोणावर तुला सर्वाधिक राग येतो?” यावर अबरारने कोणतेही संकोच न दाखवता उत्तर दिले “मला बॉक्सिंग करायचं आहे आणि माझ्यासमोर शिखर धवन उभा असावा.” त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अनेक भारतीय चाहत्यांनी अबरारवर टीकेची झोड उठवली असून, काहींनी त्याला “हार सहन न होणारा खेळाडू” म्हटले आहे.

Abrar Ahmed Controversy
Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद जिंकलं. भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का दिला होता. त्यामुळे, अबरारचे वक्तव्य हे त्या पराभवातून आलेली चीड असल्याचेही काहीजणांचे मत आहे.

Abrar Ahmed Controversy
Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन हा आपल्या हसमुख स्वभावासाठी आणि संयमी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, याआधीही त्याचा पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसोबत शाब्दिक वाद झाला होता. विशेष म्हणजे, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये आफ्रिदीच्या संघाविरुद्ध खेळण्यास धवनने नकार दिला होता. त्यामुळे अबरारच्या वक्तव्यानंतर या जुन्या वादाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर धवनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “धवनला बॉक्सिंगची गरज नाही, त्याच्या बॅटनेच पाकिस्तानला पुरेसं ठोकलंय,” अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com