New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

Mahindra Pickup SUV: देशातील सर्वात मोठी एसयूव्ही (SUV) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा एक नवीन पिकअप एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
New Mahindra SUV
New Mahindra SUV
Published on
Updated on

Mahindra Pickup SUV: देशातील सर्वात मोठी एसयूव्ही (SUV) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा एक नवीन पिकअप एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या यशस्वी स्कॉर्पिओ N प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवीन पिकअप बाजारात आणणार आहे. ऑफ-रोड एसयूव्हीमध्ये मिळवलेल्या यशानंतर, महिंद्रा आता अशी पिकअप आणणार आहे जी लाइफस्टाइल खरेदीदार (Lifestyle buyers) आणि व्यावसायिक खरेदीदार (Commercial buyers) या दोघांसाठी उपयुक्त ठरेल.

विविध व्हेरिएंट्स आणि वैशिष्ट्ये

दरम्यान, ही पिकअप अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल, जसे की डबल-कॅब आणि सिंगल-कॅब. यात महिंद्राची प्रसिद्ध ऑफ-रोड तंत्रज्ञान तसेच अनेक उपयुक्त फीचर्स मिळतील. ही नवीन पिकअप महिंद्राच्या आगामी उत्पादन योजनेचा (New Product Plan) एक भाग आहे, ज्यात नवीन थार (Thar), XUV700 आणि BE इलेक्ट्रिक गाड्यांचाही समावेश आहे. अद्याप या शानदार पिकअपची लॉन्च तारीख निश्चित झालेली नसली तरी डिझाइन आणि तंत्रज्ञानाबाबत (Technology) खूप अपेक्षा आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ N पिकअपची थेट स्पर्धा टोयोटा हिलक्स (Toyota Hilux) आणि इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉस (Isuzu D-Max V-Cross) यांसारख्या इतर लाइफस्टाइल पिकअप्सशी होईल.

New Mahindra SUV
Mahindra Thar: दमदार लूक अन् क्लासिक फीचर्ससह येतेय नवीन 'थार'; कारप्रेमींना पाडणार भुरळ!

महिंद्रा स्कॉर्पिओ N पिकअपचे डिझाइन

आत्तापर्यंत समोर आलेल्या फोटोंमध्ये, या पिकअपचा लुक खूपच दमदार आणि मजबूत दिसत आहे. याचे डिझाइन स्कॉर्पिओ-N सारखेच असेल, परंतु अधिक व्यावहारिक बनवण्यासाठी काही बदल केले जातील. डबल-कॅब डिझाइनमुळे यात लोकांना बसण्यासाठी आरामदायक जागा तसेच सामान नेण्यासाठी चांगली क्षमता असेल.

डिझाइनमध्ये नवीन फ्रंट ग्रिल (Front Grille), मजबूत बंपर (Bumper), वर बसवलेला रोलओव्हर बार (Rollover Bar) आणि मोठा लोडिंग एरिया (Loading Area) दिसू शकतो. शार्क-फिन अँटेना (Shark-fin Antenna) क्लासिक लूक देतो, तर स्टील व्हील्स (Steel Wheels) आणि हॅलोजन लाइट्स (Halogen Lights) याला अधिक मजबूत आणि किफायतशीर बनवतात.

New Mahindra SUV
Mahindra Thar: महिंद्रासाठी 'ही' एसयूव्ही ठरली गेमचेंजर, 2.5 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री; स्पर्धेत मारुती राहिली मागे

थार आणि स्कॉर्पिओसारखेच इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, स्कॉर्पिओ N प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या या पिकअपमध्ये स्कॉर्पिओ N आणि थारमधील मेकॅनिक्स दिले जाऊ शकतात. यामध्ये महिंद्राचे 2.0-लीटर mStallion टर्बो-पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल (Diesel) इंजिन समाविष्ट असू शकतात. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल (Manual) आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (Automatic) चा समावेश असू शकतो, ज्यात रियर-व्हील-ड्राइव्ह (Rear-Wheel-Drive) आणि फोर-व्हील-ड्राइव्ह (Four-Wheel-Drive) दोन्ही उपलब्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com