'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

CJI Bhushan Gavai : सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
CJI Bhushan Gavai
CJI Bhushan GavaiDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’, असे म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वकिलाने सरन्यायधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी वकिलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात समोवारी ही घटना घडली. सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी याठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आरोपी वकिलाला ताब्यात घेतले.

CJI Bhushan Gavai
Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी वकील राकेश किशोर याने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीश गवई शांत होते. त्यांनी अशा प्रकारांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही असे म्हणत कोर्टाचे कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. या घटनेचा सर्वोच्य न्यायालयाच्या वकिलांनी निषेध केला असून, सक्त कारवाईची मागणी केली आहे.

CJI Bhushan Gavai
Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

जवारी मंदिरात सात फूट उंच प्रभू विष्णूची मूर्ती पुन्हा बसविण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका १६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेला प्रसिद्धी जनहीत याचिका, असे न्यायालयाने म्हटले होते.

"ही याचिका प्रसिद्धी जनहीत याचिका आहे. याता देवालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रभू विष्णूचे भक्त असाल तर प्रार्थना करा", असे सरन्यायाधीश यांनी कथितपणे म्हटल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com