Mahindra Vision S: महिंद्राची ‘ही’ एसयूव्ही करणार क्रेटा आणि सिएराची हवा टाईट! दमदार फीचर्ससह येतेय

Manish Jadhav

महिंद्रा एसयूव्ही

महिंद्राने आपली नवीन ‘व्हिजन एस’ कॉन्सेप्ट एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये सादर केली आहे. कंपनी लवकरच या शानदार एसयूव्हीबद्दल अधिक माहिती देऊ शकते.

mahindra vision | Dainik Gomantak

‘NU IQ मॉड्यूलर’

ही एसयूव्ही नवीन ‘NU IQ मॉड्यूलर’ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्यामुळे ती पेट्रोल-डिझेल (ICE) आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये येऊ शकते.

mahindra vision | Dainik Gomantak

बाजारात कधी येणार?

ही शानदार एसयूव्ही 2027 पासून बाजारात येण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

mahindra vision | Dainik Gomantak

स्कॉर्पिओ फॅमिलीचा भाग

ही कार महिंद्राच्या लोकप्रिय स्कॉर्पिओ फॅमिलीचा भाग असू शकते. ही बाजारात हुंडाई क्रेटा आणि टाटा सिएरा सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

mahindra vision | Dainik Gomantak

डिझाइन

डिझाइनच्या बाबतीत ही एसयूव्ही ‘बेबी लँड रोवर डिफेंडर’ सारखी दिसते, ज्यात रुफ-माउंटेड दिवे, रुफ लॅडर आणि जाड ब्लॅक क्लॅडिंगसारखे ऑफ-रोड लूक देणारे फीचर्स आहेत.

mahindra vision | Dainik Gomantak

महिंद्राचा लोगो

पुढील बाजूस महिंद्राचा लोगो, उभ्या एलईडी लाइट्सचा सेट, मोठा ब्लॅक बंपर, आणि उलटे ‘L’ आकाराचे हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत.

mahindra vision | Dainik Gomantak

टायर्स

या कॉन्सेप्टमध्ये 19 इंचाचे टायर्स, फ्लश-फिटिंग डोअर हँडल्स, उलटे ‘L’ आकाराचे टेललाईट्स आणि मागच्या बाजूला स्पेयर व्हीलची (स्टेपनी) सोय आहे.

mahindra vision | Dainik Gomantak

आधुनिक फीचर्स

आतील भागात डॅशबोर्डमध्ये बसवलेली मोठी टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि एक पॅनोरॅमिक सनरुफ यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.

mahindra vision | Dainik Gomantak

Excessive Sweating: तुम्हालाही खूप घाम येतो? दुर्लक्ष करु नका, असू शकते 'या' 7 आजारांचे लक्षण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघा