तरुण उद्योजक, रितेश अग्रवालने OYO हॉटेल्स आणि होम्सच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. OYO चा संस्थापक आणि CEO रितेश अग्रवालने जगभरातील लोकांचा बजेट होम्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
भारतातील एका छोट्या शहरापासून ते उद्योग क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खरोखरच यश आणि चिकाटीची प्रेरणादायी कथा आहे.
रितेश अग्रवालचा जन्म 16 नोव्हेंबर 1993 रोजी ओरिसातील बिसम कटक या छोट्याशा गावात झाला. या गावातील मुलाने हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये स्थान मिळवण्यापर्यंत प्रवास केला आहे. या यादीनुसार रितेश जगातील सर्वात तरुण अब्जाधीश आहे. त्याच्या यशाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अग्रवाल यांच्याकडे 7,800 कोटी रुपयांची संपत्ती होती.
Oyo Rooms सुरू करण्यापूर्वी रितेशने 2012 मध्ये Oreval Stays नावाची ऑनलाइन रूम बुकिंग कंपनी सुरू केली होती. रितेशची ही कल्पना इतकी अनोखी होती की गुडगावच्या मनीष सिन्हा यांनी प्रभावित होऊन ओरेवलमध्ये गुंतवणूक केली आणि सह-संस्थापक बनले. 2013 मध्ये रितेशने या कंपनीचे नाव बदलून ओयो रूम्स असे केले.
रितेशला प्रवासाची खूप आवड आहे आणि या छंदामुळे त्याला एक अनोखी व्यवसाय कल्पना सुचली. वास्तविक, हा प्रकार 2009 च्या सुमारास घडला जेव्हा त्याला ट्रेकिंगला जाण्याची संधी मिळाली.
प्रवास करताना खोलीची व्यवस्था करण्यात खूप अडचण येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. कधी जास्त पैसे देऊन खराब खोली मिळे तर कधी कमी पैसे देऊन चांगली खोली मिळे. येथूनच त्यांच्या मनात व्यवसायाची अनोखी कल्पना जन्माला आली आणि त्यांनी ओयो रूम्सच्या रूपाने एक यशस्वी कंपनी तयार केली.
रितेश अग्रवालच्या नेतृत्वाखाली, OYO हॉटेल्स अँड होम्सने संपूर्ण भारतामध्ये आपल्या कार्याचा झपाट्याने विस्तार केला आणि नंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीचे अनोखे बिझनेस मॉडेल, ज्यामध्ये हॉटेल मालकांसोबत भागीदारी करणे आणि त्यांना तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्म देणे याचा समावेश आहे.
त्याच्या या मॉडेलने खूप लोकप्रियता मिळवली. OYO ची उपस्थिती आशिया, युरोप, मीडल ईस्ट आणि युनायटेड स्टेट्समध्ये झपाट्याने विस्तारली, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनपैकी एक बनली.
रितेश अग्रवालबद्दल आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे त्याला चीनमध्ये खूप पसंत केले जाते. चीनमध्ये रितेश अग्रवालला 'ली ताई शी' या नावाने ओळखले जाते.
27 व्या वर्षी रितेशने अवघ्या काही महिन्यांत मंदारिन ही जगातील सर्वात कठीण समजली जाणारी चीनी भाषा शिकली होती.
ओयो रूम्सचा संस्थापक रितेश अग्रवाल हा अब्जाधीश आहेत. रितेशने सुमारे 10 वर्षांपूर्वी ओयो रूम्स सुरू केली. सध्या त्यांची कंपनी 80 देशांतील 800 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या बजेट हॉटेल फ्रँचायझींपैकी एक मानले जाते. सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत रितेशचा समावेश आहे.
त्याची सध्याची निव्वळ संपत्ती 16,462 कोटी रुपये आहे. यातील जास्तीत जास्त संपत्ती त्याच्या OYO Rooms द्वारे कमवली आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2021 मध्ये त्यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट होणारा सर्वात तरुण भारतीय उद्योजक म्हणून इतिहास रचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.