Success Story Of DigiHakk Founder Sarvesh Pancholi:
असे म्हणतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत जोखीम घेणे आवश्यक आहे. हे उत्तम प्रकारे सिद्ध करणारा सर्वेश पांचोलीपेक्षा चांगला कोणी नाही. अवघ्या वीशीत नाव कमावलेला इंदोरचा सर्वेश वक्ता आणि संशोधक आहे.
सर्वेशचा जन्म मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला आणि त्याला टेक गॅजेट्स एक्सप्लोर करायला आवडतात. त्याला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना भेटायला आवडते. कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते आणि त्यामुळे तुम्हाला आयुष्यात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे त्याला वाटते.
वयाच्या 14 व्या वर्षी कर्करोगामुळे वडिलांना गमावलेल्या आणि वयाच्या 18 व्या वर्षी शाळा सोडलेल्या तरुणाची ही गोष्ट आहे. इंटरनेटच्या मदतीने तो ऑनलाइन कोर्स करत राहिला आणि 2016 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी सर्वेश पंचोलीने स्वतःची डिजिटल मीडिया कंपनी सुरू केली.
पाच वर्षांनंतर, 2022 मध्ये, कंपनीची उलाढाल वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. आज वयाच्या २६ व्या वर्षी तोअमेरिका, इंग्लंड आणि रशियासह भारतातील अनेक कंपन्यांसाठी काम करत आहे.
सर्वेश सध्या तीन कंपन्या चालवतो. डिजीहॅकमध्ये तो डिजिटल मीडिया मार्केटिंग, प्रमोशनवर काम करतो. त्याची गेट वॉ होम घराच्या सजावटीच्या उत्पादनांची विक्री करत. त्याने सिंधी मिलन नावाने एक वैवाहिक वेबसाइटही तयार केली आहे.
सर्वेशच्या डिजीहॅक कंपनीचे भारत आणि परदेशात 300 हून अधिक ग्राहक आहेत. त्याची धाकटी बहीण ऋषिता पांचोली सध्या एमबीए प्रथम वर्षात शिकत आहे. ही कंपनी सांभाळताना ती त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करते. घरात सर्वेश, ऋषिता आणि त्यांची आई असतात.
सर्वेश म्हणतो की, आज डिजिटल मीडिया हे एकमेव व्यासपीठ आहे जिथे व्यवसायाची अफाट संधी आहे. इथे कमाईला मर्यादा नाही. आज आपण अनेकदा ऐकतो की काही तरुणांनी डिजिटल माध्यमात भरपूर पैसा कमावला आणि दुसरीकडे आपण असेही ऐकतो की अनेक लोक वर्षानुवर्षे कष्ट करूनही डिजिटल माध्यमात व्यवसाय करू शकले नाहीत.
या प्रश्नावर सर्वेश म्हणतो की, बरेच लोक डिजिटल मीडियाला गांभीर्याने घेत नाहीत. ते त्यांच्या व्यवसायासह किंवा नोकरीसह डिजिटल व्यवसाय अर्धवेळ हाताळतात आणि म्हणून ते यशस्वी होऊ शकत नाहीत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूर्ण ताकदीने काम केले तर यापेक्षा जास्त पैसा कुठेही नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.