FPI Outflow News updates, The stock market has been falling for the last 6 months, Stock Market Crash Reasons, why share market fall today, Share market updates Dainik Gomantak
अर्थविश्व

FPI Outflow: शेअर बाजारमध्ये घसरण; गेले 6 महिने सुरू आहे खेळ!

या वर्षात आजपर्यंत, 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रकमेचा आकडा 1,14,855.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय शेअर बाजार गेल्या 5 महिन्यांपासून एका श्रेणीत व्यवहार करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये बाजाराने विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला होता, तेव्हापासून घसरण होत आहे. या घसरणीच्या काळात विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपला पैसा अधिक प्रमाणात काढून घेत आहेत. (The stock market has been falling for the last 6 months)

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या वर्षात आतापर्यंत भारतीय बाजारातून 1,14,855.97 कोटी रुपये काढले आहेत. शेअर बाजारात जारी करण्यात आलेल्या डिपॉझिटरी डेटानुसार, मार्च महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 48,261.65 कोटी रुपये काढले आहेत. अशाप्रकारे, आजपर्यंत, 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रकमेचा आकडा 1,14,855.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन तणाव आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ यामुळे जागतिक आर्थिक संकट पाहता विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून माघार घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर (Share Market) बाजारातून निव्वळ पैसे काढण्याचा हा सलग सहावा महिना आहे. (FPI Outflow News updates)

भारत (India) हा कच्च्या तेलाचा निव्वळ आयातदार आहे. तज्ज्ञांच्या मते, रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर (Economy) होणारा थेट परिणाम फारच मर्यादित आहे, कारण या देशांकडून होणाऱ्या आयातीवर आपले अवलंबित्व नाही. मात्र, वस्तूंच्या चढ्या किमतीमुळे आव्हाने निर्माण होत आहेत. कारण भारत कच्च्या तेलाचा निव्वळ आयातदार आहे. अशा परिस्थितीत, कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाल्याने चालू खात्यातील तूट (CAD) 0.3 टक्क्यांनी, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 0.4 टक्क्यांनी आणि सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 0.2 टक्क्यांनी प्रभावित होईल असा अंदाज आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने जानेवारीमध्ये भारतीय शेअर बाजारातून 28,526.30 कोटी रुपये काढले. फेब्रुवारीमध्ये त्यांची रक्कम 38,068.02 कोटी रुपये होती. मार्चमध्ये आतापर्यंत त्यांनी 48,261.65 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT